Today's horoscope - 21September 2020 | आजचे राशीभविष्य - २१ सप्टेंबर २०२० - वृश्चिकसाठी लाभाचा अन् मकरसाठी आनंदाचा दिवस

आजचे राशीभविष्य - २१ सप्टेंबर २०२० - वृश्चिकसाठी लाभाचा अन् मकरसाठी आनंदाचा दिवस

मेष
आज दिवसाची सुरुवात आनंदात होईल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. दुपारनंतर नवीन कार्यारंभ करू नका. उक्ती आणि कृतीवर संयम ठेवणे हिताचे ठरेल. आणखी वाचा

वृषभ
धंदा- व्यवसायात यश प्राप्ती होईल. सहकार्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. आर्थिक लाभ होतील. प्रतिस्पर्धी आश्चर्यचकित होतील. दुपारनंतर चांगले मनोरंजन होईल.  आणखी वाचा

मिथुन
आपली कल्पनाशक्ति व सृजनशीलता कामात वापराल. शारीरिक आणि मानसिक दृष्टया सावध राहाल. दुपारनंतर व्यवसायामध्ये लाभ होण्याची शक्यता.  आणखी वाचा

कर्क
निराशेमुळे मन अस्वस्थ राहील. त्यामुळे शरीरही अस्वस्थ बनेल. प्रवासाला दिवस प्रतिकूल आहे. जमीन व वाहन या विषयीच्या समस्या भेडसावतील दुपारनंतर सुख शांती लाभेल. आणखी वाचा

सिंह
परदेशस्थांकडून चांगल्या वार्ता प्राप्त होतील. धनलाभ होईल. नवीन कार्य हाती घ्या. दुपारनंतर आपण सहनशील बनाल. मानसिक निराशा होईल. आणखी वाचा

कन्या
मनाची द्विधा अवस्था विचारात घेता, नवीन कार्याचा आरंभ करू नका. बोलण्यावर ताबा ठेवला नाही तर मन दुखावण्याचे प्रसंग येतील. कुटुंबीयांबरोबर वाद-विवाद होतील. आणखी वाचा

तूळ
आज कलात्मक व सृजनशक्ति खचितच वाढेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. दृढ विचार आणि विचारातील समतोल यामुळे हाती घेतलेले काम सहज पूर्ण कराल.  आणखी वाचा

वृश्चिक
आज आपला लाभदायी दिवस आहे. आर्थिक लाभांबरोबर भाग्यातही लाभ होईल. मित्रांबरोबरच्या संबंधात प्रेम असेल. नवीन कार्य सुरू करण्यासाठी योग्य काळ. आणखी वाचा

धनु
आपला संतापी व अनियंत्रित व्यवहार आप्ल्यास अडचणीत आणेल. संबंधिता बरोबर अप्रिय घटना घडतील. दुपारनंतर शारीरिक व मानसिक स्वास्थाकडे लक्ष द्याल.   आणखी वाचा

मकर
कौटुंबिक जीवनाच्या दृष्टिने आजचा दिवस आनंदाचा धंदा-व्यवसायात बढतीचे योग. व्यवसायात अनुकूलता राहील. आणखी वाचा

कुंभ
आज बौद्धिक काम, नवनिर्मिती आणि लेखनकार्यात व्यस्त राहाल. नवीन काम सुरू कराल. दूरचा प्रवास आणि धार्मिक सहलींचे आयोजन कराल. व्यवसायात नफ्याच्या संधी जरा जपून राहा. आणखी वाचा

मीन
हितशत्रूपासून सावध राहा. गूढ विद्येचे ज्ञान प्राप्त करण्याच्या दृष्टिने दिवस चांगला आहे. दुपारनंतर परदेशात वास्तव्यास असणार्‍या मित्र परिवाराकडून वार्ता समजतील. आणखी वाचा

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Today's horoscope - 21September 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.