आजचे राशीभविष्य - 18 ऑक्टोबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 07:08 IST2019-10-18T07:08:03+5:302019-10-18T07:08:34+5:30

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

Today's Horoscope 18 October 2019 | आजचे राशीभविष्य - 18 ऑक्टोबर 2019

आजचे राशीभविष्य - 18 ऑक्टोबर 2019

मेष
आज पैसा खर्च होण्याचे योग आहेत. पैसे आणि देवाण- घेवाण या विषयी सावधानी बाळगा. कोणाशी मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्या. आणखी वाचा

वृषभ
आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आपली रचनात्मक आणि कलात्मक क्षमता वाढेल. मानसिकदृष्टया वैचारिक स्थिरता येईल. आणखी वाचा

मिथुन
आजचा दिवस शारीरिक आणि मानसिक अस्वस्थ्यामुळे तणावपूर्वक राहील. शारीरिक त्रास, विशेषतः डोळ्यांचे विकार बळावतील. आणखी वाचा

कर्क
आजचा दिवस आपणासाठी लाभदायक आहे. उत्पन्न वाढेल. इतर काही मार्गानी पण आर्थिक लाभ होतील. मित्र भेटतील. स्त्रीवर्गाकडून विशेष लाभ होईल. आणखी वाचा

सिंह
व्यवसायाच्या दृष्टिने आजचा दिवस श्रेष्ठ आहे. आज प्रत्येक कामात यश मिळेल. वरिष्ठांची मर्जी राहील. आज सर्वत्र आपला चांगला प्रभाव पडेल. आणखी वाचा

कन्या
आजचा दिवस चांगला जाईल. नातलगांसह प्रवासाचे बेत कराल. स्त्रीवर्गाकडून लाभाची शक्यता. धार्मिक कार्य व धार्मिक यात्रा यांत मग्न राहाल. आणखी वाचा

तूळ
बोलणे आणि कृती यांवर संयम ठेवणे हितावह ठरेल. द्वेषापासून दूर राहा आणि हितशत्रूपासून जपा. तब्बेतीकडे लक्ष द्या. आणखी वाचा

वृश्चिक
मित्रांबरोबर प्रवास, मोज-मजा, मनोरंजन आणि छोटया सहली तसेच भोजन, वस्त्रप्रावरण इ. मुळे आपण खूप आनंदी राहाल. आणखी वाचा

धनु
आज आर्थिक लाभाचा दिवस आहे. घरात शांतता आणि आनंदाचे वातावरण राहील. नोकरदारांना नोकरीत लाभ आणि सहकार्यांचे सहकार्य मिळेल. आणखी वाचा

मकर
आज आपले मन चिंताग्रस्त व द्विधा अवस्थेत राहील. या मनःस्थितीत कोणत्याही कामात खंबीर पणे निर्णय घेऊ शकणार नाही. दैव अनुकूल नसल्याने आज कोणतेही महत्वपूर्ण काम करू नका. आणखी वाचा

कुंभ
आज मानसिक तणावामुळे ग्रासून जाल. धनप्राप्ती संबंधी योजना आखाल. स्त्रीयांचा अलंकार, वस्त्र, सौंदर्य प्रसाधने यांवर पैसा खर्च होईल.  आणखी वाचा

मीन
आजचा दिवस शुभ फलदायक जाईल. आपली कलात्मक व सृजनात्मक क्षमता वाढेल. वैचारिक स्थिरता आल्याने सर्व कामे व्यवस्थित पार पडतील. आणखी वाचा

Web Title: Today's Horoscope 18 October 2019