आजचे राशीभविष्य - 14 सप्टेंबर 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2019 07:32 IST2019-09-14T07:23:20+5:302019-09-14T07:32:19+5:30
कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

आजचे राशीभविष्य - 14 सप्टेंबर 2019
मेष
आज आपणावर लक्ष्मीची कृपादृश्टी राहील. विवाहोत्सुकांना योग्य जोडीदार मिळण्याचे योग आहेत. सामाजिक क्षेत्रात यश व प्रसिद्धी मिळेल. व्यापारात लाभ होतील. सहलीचे नियोजन कराल. दुपारनंतर मात्र मानसिक एकाग्रता राहणार नाही... आणखी वाचा
वृषभ
सर्व प्रकारच्या मानसिक तणावापासून मुक्त व्हाल. तब्बेतही छान राहील. कौटुंबिक जीवनात सुख- समाधानचा अनुभव घ्याल. व्यवसाय धंद्यात यश मिळेल. कामाचे कौतुक होईल आणि वरिष्ठ आपणांवर प्रसन्न राहतील. दुपारनंतर नवीन कामाचे नियोजन कराल... आणखी वाचा
मिथुन
संमिश्र फलदायी दिवस जाईल. तब्बेतीत चढ-उतार होतील. व्यवसाय- नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी नाखूष राहतील, त्यामुळे त्रास होईल. खर्च वाढेल. संततीची काळजी राहील. दुपारनंतर कार्यात यश दृष्टिक्षेपात आल्याने मनाला आनंद वाटेल... आणखी वाचा
कर्क
आज मन शांत आणि आनंदी राहण्यासाठी ईश्वराचा नाम जप आणि आध्यात्मिक वाचन हाच एकमेव उपाय. रागाला आवर घाला. अनैतिक कृत्ये आणि नकारात्मक विचारापासून दूर राहा. पैशाची चणचण भासेल. दुपारनंतर मात्र तब्बेत चांगली राहील... आणखी वाचा
सिंह
आज आपणाला मनोरंजनाची अनेक साधने उपलब्ध होतील. मित्र आणि स्नेहीजनांसह आनंद लुटाल. सहलीचा आनंद लुटाल. दुपारनंतर मात्र खूप विचार केल्यामुळे मानसिक थकवा जाणवेल. पैशाची चणचण भासेल... आणखी वाचा
कन्या
आजचा दिवस आपणाला शुभ जाईल. कार्यात यश मिळाल्याने खुश राहाल. यश व प्रसिद्धी वाढेल. कौटुंबिक वातावरण अनुकूल राहील. त्यामुळे शारीरिक व मानसिक दृष्टया आपण तरतरीत व प्रफुल्लित राहाल. भावनावश होऊन वाहवत जाऊ नका... आणखी वाचा
तूळ
लेखनकार्य आणि सृजनशीलता या दृष्टिने आजचा दिवस शुभ आहे. बौद्धिक चर्चेतून लाभ होण्याविषयी आपण विचार कराल. त्यात यशही मिळेल. कीर्ती वाढेल. आज जास्त भावनावश व्हाल. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील... आणखी वाचा
वृश्चिक
भावनेच्या आहारी जाऊ नका. त्यामुळे मानसिक ताण कमी होईल. आर्थिक नियोजन कराल. वस्त्र, दागिने व सौंदर्य प्रसाधने यांवर खर्च होईल. आईकडून लाभ मिळेल. दुपारनंतर विचारात एकदम बदल होईल. नवीन काम हाती घेऊ नका... आणखी वाचा
धनु
आज मन उत्साहित राहील व हल्केपणा जाणवेल. कुटुंबीयांसह कौटुंबिक प्रश्नांवर चर्चा होईल त्यातून योग्यनिर्णय घ्याल. मित्रांशी संबंध वाढतील आणि प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. भाग्यवृद्धीचे योग आहेत. दुपारनंतर मात्र जास्त संवेदनशील बनाल... आणखी वाचा
मकर
आज धार्मिक विचारांबरोबर धार्मिक कार्यावरही खर्च होईल. वादविवादामुळे कौटुंबिक वातावरण गढुळ होऊ नये याकडे लक्ष द्या. परिवारातील सदस्यांचे मन दुखावेल व ते नाराज होतील. दुपारनंतर मनातील चिंता दूर होतील... आणखी वाचा
कुंभ
आज आपले मन आनंदी राहील. गहन चिंतनशक्ती आणि आध्यात्मिकता यात मन गुंतून जाईल. मनातून नकारात्मक विचार काढून टाकण्याचा सल्ला गणेशजी देत आहेत. उक्तीवर संयम ठेवा. अचानक उद्भवणार्या खर्चावर नियंत्रण ठेवा... आणखी वाचा
मीन
कोणाशी आर्थिक व्यवहार करू नका व वादविवाद करू नका. मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करा. आज खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. आप्तांशी कटुप्रसंग उद्भवतील. दुपारनंतर तब्बेतीत सुधारणा होईल. मनःस्वास्थ्यही मिळेल... आणखी वाचा