आजचे राशीभविष्य - 14 एप्रिल 2020

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 07:26 IST2020-04-14T07:24:47+5:302020-04-14T07:26:08+5:30

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

todays horoscope 14 april 2020 sss | आजचे राशीभविष्य - 14 एप्रिल 2020

आजचे राशीभविष्य - 14 एप्रिल 2020

मेष 

 

आज आपणात तरतरीतपणा आणि उत्साह यांचा अभाव राहील. तसेच रागाचे प्रमाण वाढेल. त्यामुळे काम बिघडण्याची शक्यता आहे. म्हणून रागावर ताबा ठेवा. कार्यालयात अधिकारी, घरात कुटुंबीय आणि विरोधक यांच्याशी वादात न पडता शांत राहा... आणखी वाचा

वृषभ 

कामाचा खूप व्याप आणि खाण्यापिण्याची बेपर्वाही यामुळे तब्बेत बिघडेल. वेळेवर जेवण आणि झोप न झाल्याने मानसिक बेचैनी वाटेल. प्रवासात विघ्न येण्याची शक्यता असल्याने प्रवास करू नका. नियोजित वेळेत काम पूर्ण न झाल्याने रोष ओढवून घ्याल... आणखी वाचा

मिथुन 

मौज-मजा आणि मनोरंजन यांत विशेष रस घ्याल. कुटुंबीय, मित्रमंडळी आणि प्रिय व्यक्तींबरोबर बाहेर फिरायला जाण्याचा बेत कराल. सार्वजनिक जीवनात मान- प्रतिष्ठा वाढेल. भिन्न लिंगीय व्यक्तीचे आकर्षण वाटेल... आणखी वाचा

कर्क

आजचा दिवस खुशीचा आणि यशाचा जाईल. कुटुंबात सुख- शांती आणि समाधान राहील. नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण राहील. नोकर वर्गाकडून आणि मातुल घराण्याकडून लाभ होईल. तब्बेत चांगली राहील... आणखी वाचा

सिंह

आज आपण शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या शांतपणे काम कराल. सृजनात्मक कामांकडे अधिक गोडी लागेल. साहित्य आणि कला क्षेत्रांत काही नवनिर्मिती केल्याने प्रेरणा मिळेल. प्रेमिक आणि प्रिय व्यक्तींशी भेट आणि मुलाखत होईल... आणखी वाचा 

कन्या ​​​​​​​

आज आपणाला प्रतिकूलतेला तोंड देण्यास तयार राहावे लागेल. तब्बेती विषयक तक्रारी राहतील. मनावर काळजीचे दडपड राहिल्याने मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. घरातील व्यक्तींशी खटका उडेल. आईच्या तब्बेतीची काळजी राहील... आणखी वाचा

तूळ

सांप्रतकाळी भाग्योदय झाल्याने धाडस करणे, एखादे काम हाती घेणे यांसाठी दिवस शुभ आहे. योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आपणास लाभदायक ठरेल. कुटुंबात भावंडांशी आपलेपणा राहील आणि खेळीमेळीचे वातावरण असेल... आणखी वाचा

वृश्चिक 

नकारात्मक मानसिक वृत्ती टाळा असा सल्ला. 'मौनं सर्वार्‍यां साधनम्' या नीतीने वागा म्हणजे कुटुंबातील व्यक्तींशी संघर्ष होणार नाही. तब्बेतीच्या तक्रारी राहतील. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा.​​​​​​​.. आणखी वाचा

धनु

आपल्या कामात यश आणि आर्थिक लाभाची शक्यता वर्तवितात. एका मंगल कार्यास सहकुटुंब हजर राहाल. प्रवासाची, विशेषतः तीर्थयात्रेची शक्यता आहे. स्वकीयांची भेट आपणाला आनंदित करील... आणखी वाचा

मकर ​​​​​​​

आज आपण धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यांत मग्न राहाल. पूजा- पाठ, धार्मिक कार्यांवर पैसा खर्च होईल. नातलग, संबंधित आणि कुटुंबीय यांच्याशी जपून बोला कारण आपले बोलणे कोणाचे मन दुखावण्याची शक्यता आहे... आणखी वाचा

कुंभ ​​​​​​​

नवे काम हाती घेऊ शकाल. नोकरी धंद्यात लाभ होतील आणि जादा उत्पन्न मिळेल. मित्रगण विशेषतः स्त्री वर्गाकडून लाभ होईल. सामाजिक क्षेत्रात आपणाला प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा मिळेल... आणखी वाचा

मीन 

आजचा दिवस आपणाला शुभ फलदायी आहे. कामातील यश आणि वरिष्ठ अधिकार्‍यांचे प्रोत्साहन आपला उत्साह द्विगुणित करेल. व्यापारी वर्गाला व्यापारात आणि उत्पन्नात वाढ होईल. येणी वसूल होतील. वडील आणि वडीलधार्‍यांकडून लाभ होईल... आणखी वाचा

 

Web Title: todays horoscope 14 april 2020 sss