Todays Horoscope 02 March 2021 | राशीभविष्य - ०२ मार्च २०२१ : मेषसाठी आनंदाचा अन् मिथुनसाठी काळजीचा दिवस

राशीभविष्य - ०२ मार्च २०२१ : मेषसाठी आनंदाचा अन् मिथुनसाठी काळजीचा दिवस

मेष - आज शारीरिक आणि मानसिक स्फूर्ति अनुभवाल. घरातील वातावरण आनंदी राहील. आर्थिक लाभ होतील. व्यवसायातही समाधान समाजात पतप्रतिष्ठा वाढेल. आणखी वाचा  

वृषभ - आज अचानक खर्चाची शक्यता आहे. विद्यार्थ्यांच्या विद्याभ्यासात संकटे येतील. मन उद्विग्न होईल. परंतु दुपारनंतर घरातील वातावरण सुख- शांतीचे असेल. आरोग्यात सुधारणा होईल. आणखी वाचा  

मिथुन - घरदार व जमीनजुमला या विषयाच्या कागदकामाबाबत आज दक्ष रहावे लागेल. कुटुंबियाबरोबर विनाकारण वाद होतील. संतती विषयी काळजी लागून राहील. आणखी वाचा  

कर्क - अध्यात्म आणि गूढ विद्या करून घेण्यासाठी आजचा दिवस चांगला असल्याचे श्रीगणेश सुचवतात शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्य तुम्हाला आनंदी ठेवेल. आज तुम्ही अधिक संवेदनशील बनाल. दुपारनंतर चिंतीत रहाल. आणखी वाचा  

सिंह - आज आपण आपल्या गोड शब्दांनी कार्य सिद्ध कराल. कुटुंबाबरोबर आनंदात वेळ घालवाल. परंतु दुपारनंतर अविचाराने कोणताही निर्णय घेऊ नका, असा गणेशजींचा सल्ला आहे. आणखी वाचा  

कन्या - आजचा दिवस तुम्हाला शुभफलदायी आहे. तुमच्या प्रभावी बोलण्याने तुम्ही प्रेमाचे व लाभदायक संबंध प्रस्थापित कराल. आपल्याजवळची वैचारिक समृद्धता लोकांना प्रभावीत करेल. व्यावसायिक दृष्टिने आजचा दिवस फायद्याचा.  आणखी वाचा  

तूळ - आकस्मिक खर्चाबाबत सावधान रहा. शरीर व मन अस्वस्थ असल्यामुळे मित्रांबरोबर भांडण व वादविवाद होणार नाहीत याची काळजी घ्या. कोर्ट कचेरी पासून जरा संभाळून रहा. आणखी वाचा  

वृश्चिक - आज आपल्याला अनेक बाबींत लाभ, यश व किर्ती मिळेल. धनप्राप्तीचे योगही संभवतात. मित्रांसाठी पैसा खर्च करावा लागेल. परंतु त्यांच्या बरोबर फिरण्याचा आनंद मिळेल.  आणखी वाचा  

धनु - आजचा आपला दिवस लाभदायी असेल. घर आणि व्यवसाय दोन्हीही क्षेत्रात आज आनंद व समाधानाचे वातावरण राहील. प्रकृती ठीक राहील. व्यवसाय धंद्यात फायदा, तसेच सरकारी कामातही लाभ होईल.  आणखी वाचा  

मकर - विदेशातून आप्तेष्टांची काही चांगली बातमी आपले मन आनंदित करेल. धार्मिक यात्रा घडेल. मनात असलेली एखादी कामासंबंधीची योजना पूर्ण होईल. आणखी वाचा  

कुंभ - आजचा पूर्ण दिवस आपल्यासाठी शुभ आहे असे गणेशजी म्हणतात. राग व बोलणे यावर संयम ठेवा. कुटुंबियांशी वाद करू नका. दुपारनंतरचा आपला वेळ मित्रांसोबत आनंदात जाईल.  आणखी वाचा  

मीन - आज दैनंदिन कामात शांतता मिळेल. मित्र व ओळखीच्या लोकांबरोबर जाऊन एखादया मनोरंजन स्थळाचा आनंद लुटण्याचे ठरवू शकाल. व्यापारात भागीदाराबरोबर चांगले संबंध राहतील. आणखी वाचा 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Todays Horoscope 02 March 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.