आजचे राशीभविष्य - २४ सप्टेंबर २०२१: ‘या’ ८ राशीच्या व्यक्तींना लाभाचा, आनंददायी दिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 07:14 AM2021-09-24T07:14:42+5:302021-09-24T07:15:22+5:30

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

todays daily horoscope september 24 2021 know what your rashi says rashibhavishya | आजचे राशीभविष्य - २४ सप्टेंबर २०२१: ‘या’ ८ राशीच्या व्यक्तींना लाभाचा, आनंददायी दिवस

आजचे राशीभविष्य - २४ सप्टेंबर २०२१: ‘या’ ८ राशीच्या व्यक्तींना लाभाचा, आनंददायी दिवस

Next

मेष - श्रीगणेशांच्या आशीर्वादाने आपले प्रत्येक काम उत्साह आणि आवेश यांनी पूर्णतः भरलेले असेल असा अनुभव येईल. शरीर व मन स्फूर्ती आणि टवटवीतपणाने भरेल. परिवारातील वातावरण चांगले राहील. धनलाभ, रुचकर भोजन आणि भेटवस्तू मिळाल्याने आपला आनंद वाढेल. आईकडून लाभ होईल. अधिक वाचा

वृषभ - क्रोध आणि निराशेची भावना मनात पसरेल. तब्बेत साथ देणार नाही. घर-परिवाराच्या चिंतेबरोबरच खर्चा बाबतीतही चिंता राहील. आपली उग्र वाणी कोणाशी मतभेद किंवा भांडणाचे कारण बनू शकेल. परिश्रम वाया जात आहेत असे वाटेल. गैरसमजापासून जपून राहण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. अधिक वाचा

मिथुन - कुटुंबात खुशीचे, आनंदाचे वातावरण राहील. नोकरी- व्यवसायात लाभाच्या वार्ता मिळतील. उच्च पदाधिकारी तुमच्या कामाची प्रशंसा करतील. विवाहयोग आहेत. स्त्री स्नेह्यांकडून विशेष लाभ होतील. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता श्रीगणेशांना दिसते. अधिक वाचा

कर्क - गृहसजावटीवर विशेष लक्ष द्याल. घरगुती वापराचे नवीन साहित्य खरेदी कराल. व्यापारी आणि नोकरदार लाभाची आणि बढतीची अपेक्षा करू शकतात. कुटुंबात सुख- शांती लाभेल. सरकारी लाभ मिळतील. आपली मानप्रतिष्ठा वाढेल. आर्थिक लाभ होईल. अधिक वाचा

सिंह - श्रीगणेश सांगतात की स्वभावात उग्रता आणि संताप असल्यामुळे काम करण्यात आपले मन लागणार नाही. वादविवादात आपल्या अहंकारमुळे कोणाची नाराजी ओढवून घ्याल. तब्बेतीकडे लक्ष द्यावे लागेल. उतावीळपणामुळे निर्णय घेणे किंवा वाटचाल करणे यामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. अधिक वाचा

कन्या - श्रीगणेशांच्या दृष्टीने आज तुम्ही एखादे काम हाती घेणे हिताचे ठरणार नाही. बाहेरचे खाण्यामुळे तब्बेत बिघडण्याची शक्यता आहे. क्रोधावर नियंत्रण ठेवण्यासाठी मौन हेच शस्त्र उपयुक्त ठरेल. पैसा जास्त खर्च होईल. हितशत्रूपासून सावध राहा. आग आणि पाणी यापासून जपा. अधिक वाचा

तूळ - प्रणय, रोमान्स, मनोरंजन आणि मौज- मस्तीचा दिवस आहे. सार्वजनिक जीवनात महत्त्व मिळेल. यश आणि कीर्ती वाढेल. भागीदारांबरोबर लाभाच्या गोष्टी होतील. भारी वस्त्रे आणि अलंकार यांची खरेदी होईल. दांपत्यसुख व वाहनसुख चांगले मिळेल. तब्बेत आणि मनःस्वास्थ्य चांगले राहील. अधिक वाचा

वृश्चिक - आज आपण निश्चिंतपणा आणि सुखशांतीमध्ये घरात वेळ घालवाल. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य कार्य करण्यासाठी उत्साह देईल. कामाच्या ठिकाणी सहकारी वर्गाची खूप मदत झाल्याने अनेक कामे हाता वेगळी कराल. अपूर्ण कामे तडीस जातील. अधिक वाचा

धनु - यात्रा- प्रवासाचा बेत स्थगित ठेवा असा श्रीगणेशांचा सल्ला आहे. कार्यातील अपयश मनात निराशा निर्माण करील आणि त्यामुळे संताप वाढेल. पण हा राग नियंत्रणात ठेवल्याने गोष्टी जास्त चिघळणार नाहीत. पोटाच्या तक्रारीने हैराण व्हाल. वाद-विवाद किंवा चर्चा यामुळे समस्या निर्माण होईल. संततीची काळजी वाटेल. अधिक वाचा

मकर - प्रतिकूलतेला तोंड द्यावे लागेल असा इशारा श्रीगणेश देतात. घरगुती क्लेश मनाला यातना देतील. आईची तब्बेत मनात चिंता उत्पन्न करेल. सार्वजनिक जीवनात अपयश, अपकीर्ती होईल किंवा मान- प्रतिष्ठेची हानी होईल. पुरेशी विश्रांती आणि झोप न मिळाल्याने तब्बेत बिघडेल. अधिक वाचा

कुंभ - श्रीगणेश सांगतात की आज आपले मन मोकळेपणा अनुभवेल. शारीरिक स्वास्थ्य आपला उत्साह वाढवेल. शेजारी आणि भावंडांशी अधिक मेळ जमेल. स्नेहीजन घरी आल्याने आनंद वाटेल. प्रवासाची शक्यता आहे. अधिक वाचा

मीन - जादा खर्च, संताप आणि जीभ यावर संयम ठेवण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. कोणाशी भांडण होण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहार आणि पैशाची देव-घेव याविषयी सावध राहा. घरातील लोकांशी भांडण होईल. नकारात्मक विचार मनावर छाप पाडतील. ते दूर करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. अधिक वाचा
 

Web Title: todays daily horoscope september 24 2021 know what your rashi says rashibhavishya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app