Rashi Bhavishya Todays horoscope for 6 April 2021 Significant discussions with seniors in the workplace | Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य ६ एप्रिल २०२१; कामाच्या ठिकाणी उच्चाधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण विचार-विनिमय कराल

Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य ६ एप्रिल २०२१; कामाच्या ठिकाणी उच्चाधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण विचार-विनिमय कराल

मेष - श्रीगणेश सांगतात की आज कुटुंबीयां समवेत घरगुती बाबींचा महत्त्वपूर्ण विचार- विनिमय कराल. घराचा कायापलट करण्याच्या नवीन योजना आखाल. कामाच्या ठिकाणी उच्चाधिकार्‍यां सोबत महत्त्वपूर्ण मुद्दयांवर विचार- विनिमय कराल. आणखी वाचा

वृषभ - श्रीगणेश सांगतात की विदेशात राहणारे नातलग किंवा मित्र यांच्याकडून बातमी मिळाल्याने मनाला प्रसन्नता लाभेल. परदेशी जाण्याची इच्छा असणार्‍या लोकांना अनुकूल योग आहेत. आणखी वाचा

मिथुन- कोणत्याही प्रकारच्या आपत्तीपासून बचाव होण्यासाठी रागावर नियंत्रण ठेवण्याची सूचना श्रीगणेश देत आहेत. शस्त्रकियेसाठी आजचा दिवस अनुकूल नाही. खर्च वाढल्याने आर्थिक चणचण भासेल. आणखी वाचा

कर्क - श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस तुम्ही मौज- मजा आणि मनोरंजन यात गढून जाल. मित्र आणि कुटुंबीयांसमवेत करमणूक केन्द्र किंवा पर्यटनस्थळी जाण्याची संधी मिळेल. स्वादिष्ट भोजन लाभेल. नवी वस्त्रे व अलंकार खरेदी होईल. वाहनसुख मिळेल. आणखी वाचा

सिंह - श्रीगणेशांच्या मते आज घरात हर्ष आणि आनंदाचे वातावरण राहील. घरातील व्यक्तींबरोबर आनंदात वेळ घालवाल. शारीरिक स्वास्थ्य चांगले राहील. यश, कीर्ती आणि आनंद लाभेल. नोकरीत सहकारी चांगले सहकार्य करतील. आणखी वाचा

कन्या - आज आपणाला संतती समस्येमुळे चिंता राहील. अपचनासारख्या पोटाच्या तक्रारी राहतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडथळे येतील. बौद्धिक चर्चा आणि बोलाचालीत भागच घेऊ नका.  आणखी वाचा

तूळ - गणेशजी सांगतात की अतिशय संवेदनशीलता आणि विचारांचे अवडंबर यामुळे मानसिक अस्वास्थ्य राहील. माता आणि स्त्रियांच्या बाबतीत काळजी लागून राहील. आणखी वाचा

वृश्चिक - श्रीगणेश कृपेने आजचा दिवस खुशीत घालवाल. नवीन कामाची सुरुवात कराल. घरात भावंडांशी सलोख्याचे संबंध राहतील. स्वकीय आणि मित्रांशी सुसंवाद साधाल. जवळपासचे प्रवास होतील. आणखी वाचा

धनु - आपला आजचा दिवस मध्यम फलदायी सिद्ध होईल असे श्रीगणेश सांगतात. कुटुंबातील सदस्यांशी गैरसमज निर्माण झाल्यामुळे मतभेद वाढतील. आज मानसिक व्यवहारात खंबीरता नसल्यामुळे कोणताही निर्णय घाईगडबडीने घेऊ नका. आणखी वाचा

मकर - श्रीगणेश सांगतात की आजचा आपला दिवस ईश्वर नाम- स्मरणात जाईल. धार्मिक कार्यात मग्न राहाल. नोकरी व्यवसायात अनुकूल परिस्थिती असेल. प्रत्येक काम सहजपणे पूर्ण होईल. मान सम्मान मिळेल. नोकरीत बढतीचे योग आहेत. आणखी वाचा

कुंभ - आरोग्याविषयी जागरूक राहणे आवश्यक आहे, असा सल्ला श्रीगणेश देतात. मानसिक स्वास्थ्य राहणार नाही. कोर्ट- कचेरीतील कटकटीमध्ये पडू नका. अयोग्य ठिकाणी पैशाची गुंतवणूक होऊ नये याकडे लक्ष द्या. आणखी वाचा

मीन - मित्रांकडून आपणाला लाभ होईल आणि त्यांच्यावर खर्च करावा लागेल. सामाजिक कार्यात गोडी वाटेल. मित्र आणि वडीलधार्‍यांशी संपर्क होतील. एखाद्या रम्य स्थळी सहलीचे नियोजन कराल. आणखी वाचा
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Rashi Bhavishya Todays horoscope for 6 April 2021 Significant discussions with seniors in the workplace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.