राशीभविष्य - १४ सप्टेंबर २०२१: शुभ समाचार येतील, भाग्यवृद्धी अन् लाभाचा योग

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 07:03 AM2021-09-14T07:03:41+5:302021-09-14T07:04:13+5:30

Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...

Horoscope - September 14, 2021: Good news will come, fortune will increase and profit will be added | राशीभविष्य - १४ सप्टेंबर २०२१: शुभ समाचार येतील, भाग्यवृद्धी अन् लाभाचा योग

राशीभविष्य - १४ सप्टेंबर २०२१: शुभ समाचार येतील, भाग्यवृद्धी अन् लाभाचा योग

Next

मेष - नवीन कामाला सुरुवाता करण्याचा गणेशजींचा सल्ला आहे. गूढ विद्या तसेच रहस्यमय विषय समजून घेण्याचा आज प्रयत्न करा. उक्ती आणि कृतीवर संयम ठेवा, तेच आपल्या फायदयाचे आहे. आणखी वाचा

वृषभ - दिवसाची सुरुवात आनंदाने व मित्रभेटीने होईल. नवीन माणसे भेटतील. सहलींचे आयोजन होऊ शकंते. परंतु दुपारनंतर सावध राहण्याचा सल्ला गणेशजी देतात. आणखी वाचा

मिथुन -  गणेशजी सांगतात की आपला आजचा दिवस मनोरंजनातून आनंद घेण्याचा आहे. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. कार्यालयात सहकार्याचे वातावरण असेल. आणखी वाचा

कर्क - प्रतिकूलतेतून कष्टाने काम कराल तर पुढे रहाल. पोटाच्या तक्रारी निर्माण होतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. परंतु दुपारनंतर परिस्थिती अनुकूल बनेल. आणखी वाचा

सिंह - आज सांभाळून चालण्याचा दिवस असल्याचे श्रीगणेश सांगतात. मानसिक स्थिती तणावपूर्ण राहील व शारीरिकदृष्टया अस्वस्थता जाणवेल. कुटुंबियांशी एखादा खटका उडू शकतो. आणखी वाचा

कन्या - आपल्याला भाग्यवृद्धि आणि लाभाचा योग असल्याचे गणेशजी सांगतात. आप्तांकडून फायदा. आपसातील संबंधात प्रेम आणि सन्मानाचे वातावरण असेल.  आणखी वाचा

तूळ –  शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडू शकते. कौटुंबिक वादात बोलण्यावर संयम ठेवा. नकारात्मक मानसिकता सोडून द्या. घरच्या सदस्याना चिंता होणार नाही याकडे लक्ष द्या. आणखी वाचा

वृश्चिक - आजचा आपला मध्यम दिवस आहे. सुख व समाधान अनुभवाल. कुटुंबियासमवेत आनंदात वेळ घालवाल. शुभ समाचार येतील. दुपारनंतर कुटुंबात वाद होऊ शकतात. आणखी वाचा

धनु - आजचा दिवस दुर्घटना तसेच शल्यचिकित्सा यापासून सांभाळून रहा असा श्रीगणेश सल्ला देत आहेत. आनंद व सुख यासाठी अधिक खर्च होईल. स्वभाव तापत बनेल. आणखी वाचा

मकर -  आजचा दिवस व्यापार धंद्यासाठी लाभदायक आहे असे गणेशजी सांगतात. पत्नी आणि पुत्र यांच्याकडून फायदा होईल. पारिवारिक जीवनात घडणारे सुखदायी प्रसंगामुळे मन आनन्दी राहील. आणखी वाचा

कुंभ- आजचा दिवस लाभदायक आहे असे गणेशजी सांगतात. व्यवसाय धंदयात प्राप्ती होईल. मानसम्मान होईल. नोकरी व्यवसायात पदोन्नती. वरिष्ठ आपल्यावर प्रसन्न राहतील. आणखी वाचा

मीन- बौद्धिक विषयात व त्या संबंधी लेखनात आज आपण मग्न रहाल. नवीन कार्याची सुरुवात करू शकता. दूरचे प्रवास व तीर्थयात्रा यांचे योग आहे, मोठया प्रतिष्ठानला भेट द्याल. आणखी वाचा

Web Title: Horoscope - September 14, 2021: Good news will come, fortune will increase and profit will be added

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app