Horoscope - March 3, 2021: Pisces people stay away from anti-government activities; Be patient with anger | राशीभविष्य - ३ मार्च २०२१: मीन राशीतील व्यक्तींनी सरकार विरोधी कृत्यांपासून दूर राहा; क्रोध अन् वाणीवरही संयम ठेवा

राशीभविष्य - ३ मार्च २०२१: मीन राशीतील व्यक्तींनी सरकार विरोधी कृत्यांपासून दूर राहा; क्रोध अन् वाणीवरही संयम ठेवा

मेष - आज सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रांत आपण प्रशंसेस पात्र ठराल असे श्रीगणेश सांगतात. धनलाभाचे योग आहेत. कौटुंबिक जीवनात सुख व संतोष अनुभवाल. आणखी वाचा

वृषभ -दिवस खूप आनंदात जाईल असे गणेश सांगतात. मानसिक स्वास्थ्य लाभेल. आपले काम निर्धारित वेळेत नियोजनानुसार पूर्ण होईल. आर्थिक लाभ संभवतात. आणखी वाचा

मिथुन -  जीवनसाथी आणि संतती यांच्या आरोग्याविषयी विशेष लक्ष पुरविण्याची पूर्वसूचना श्रीगणेश देत आहेत. वाद-विवाद आणि बौद्धिक चर्चेपासून दूर राहा. आणखी वाचा

कर्क -ग्लानीमुळे आज आपले मन दुःखी राहील असे श्रीगणेश सांगतात. प्रफुल्लता, स्फूर्ती आणि आनंद यांचा अभाव राहील. कुटुंबीयांशी तक्रारी वाढतील. आणखी वाचा

सिंह - श्रीगणेशकृपेने आजचा दिवस सुखासमाधानात जाईल. भावंडाबरोबरच्या संबंधात जवळीक निर्माण होईल. त्यांचे सहकार्य पण आपणास मिळेल. आणखी वाचा

कन्या - आज कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील असे श्रीगणेश सांगतात. गोड बोलण्याने आपण आपले निर्धारित काम पूर्ण करू शकाल. आणखी वाचा

तूळ – श्रीगणेश सांगतात की आज आपण आर्थिक नियोजन व्यवस्थित कराल. सृजनशीलता वाढेल. शारीरिक आणि मानसिकदृष्टया स्वास्थ्य लाभेल. दृढ विचारांमुळे हाती घेतलेले काम पूर्ण कराल. आणखी वाचा

वृश्चिक - आपल्या स्वभावातील तामसवृत्ती आणि बोलणे यावर संयम ठेवण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. शारीरिक शैथिल्य आणि मानसिक चिंता यांमुळे मन ग्रासून जाईल. आणखी वाचा

धनु -आजचा दिवस आपणाला लाभदायी आहे असे श्रीगणेश सांगतात. आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील. आणखी वाचा

मकर - कुटुंब आणि संतती यांच्याविषयी आपणाला आनंद आणि समाधान वाटेल. स्नेही व मित्रांच्या भेटीने मन प्रसन्न होईल. व्यापारात पैशाच्या वसुलीसाठी बाहेर जावे लागेल आणि ते फायदेशीर ठरेल. आणखी वाचा

कुंभ -प्रतिस्पर्ध्यांशी वादविवाद न करण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. शारीरिक अस्वास्थ्य राहील. शैथिल्य आणि आळस राहील. मानसिक प्रसन्नता लाभेल. आणखी वाचा

मीन - आज अनैतिक कामात न पडण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. क्रोध आणि वाणीवर संयम ठेवा. आरोग्या विषयी दक्ष राहा. सरकार विरोधी कृत्यांपासून दूर राहा. आणखी वाचा

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Horoscope - March 3, 2021: Pisces people stay away from anti-government activities; Be patient with anger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.