राशीभविष्य - 2 फेब्रुवारी 2022: आर्थिक निर्णय जपून घ्या, 'या' राशींना मोलाचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 07:26 IST2022-02-02T07:23:30+5:302022-02-02T07:26:53+5:30
Horoscope : जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...

राशीभविष्य - 2 फेब्रुवारी 2022: आर्थिक निर्णय जपून घ्या, 'या' राशींना मोलाचा सल्ला
मेष - आर्थिक आवक चांगली राहिल. मात्र, आर्थिक निर्णय जपून घेतले पाहिजेत. विविध मार्गांनी फायदे होतील, जीवनसाथीही मधुर संबंध राहतील. काहींना प्रवास करावा लागेल, प्रसिद्धी मिळेल. नावलौकिक वाढविणाऱ्या घटना घडतील. गृहसौख्य चांगले राहिल.
वृषभ - नोकरीत नवीन जबाबदारी अंगावर पडेल, गुप्त शत्रूंपासून सावध राहा. कागदपत्रे वाचून मगच सही करा. तुमच्या निष्काळजीपणाचा विरोधक फायदा घेऊ शकतात. सतर्क राहून कामे केली पाहिजेत, काहींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता.
मिथून- भाग्याचे पाठबळ मिळेल, काहींना प्रवास करावा लागेल. प्रवासात अनोळखी लोकांशी सावधपणे व्यवहार करा. कुणी गैरफायदा घेऊ शकते. जीवनसाथी चांगली साथ देईल. नोकरीत सामान्य परिस्थिती राहिल. आरोग्याची काळजी घ्या.
कर्क - आरोग्याची काळजी घ्या, दगदग होईल अशी कामे करू नका. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. शक्यतो प्रवास टाळलेले बरे राहील. वाहन जपून चालवा. घरात सामान्य वातावरण राहिल. आर्थिक आवक चांगली राहिल.
सिंह - जीवनसाथीशी रुसवा फुगवा होईल. काही कारणाने गैरसमज होतील. पण जोडीदार तुम्हाला सांभाळू घेईल. व्यवसायात विक्री चांगली होईल. भागिदारी व्यवसाय जपून करा. तब्येतीची काळजी घ्या, आराम करणे आवश्यक आहे.
कन्या - तब्येतीची काळजी घ्या, दगदगीची कामे टाळा. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. थोडा संयम ठेवलेला बरा, गुप्त शत्रूंपासून सावध राहा. मुलांच्या यशाच्या वार्ता कानावर पडतील. नोकरीता प्रगती होईल. थोडे वादही होतील, घरात संमिश्र परिस्थिती राहिल.
तूळ - मुलांना चांगल्या संधी चालून येतील. त्यांच्या प्रगतीचा आढावा घ्या. त्यांना काही अडचणी असतील तर समजून घ्या. काहींना प्रवास करावा लागेल, भाग्याची साथ मिळेल. व्यवसायात भरभराट होईल, नोकरीत अनुकूल परिस्थिती राहिल.
वृश्चिक - जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. त्यात आपल्याला फायदा होईल. घरी पाहुणे येतील, खाण्यापिण्याची चंगळ राहिल. आर्थिक लाभ होतील. भावंडांची भेट होईल. व्यवसायात संमिश्र प्रतिसाद राहिल. नोकरी व्यवसायात प्रगती करता येईल.
धनू - व्यवसायात विक्री चांगली होईल, नवीन संधी मिळतील. मात्र, मोठे व्यवहार सांभाळून करा. काहींना प्रवास करावा लागेल. भावंडांशी गैरसमज होतील. तरुण वर्गाला प्रेमात यश मिळेल. जमिनीचे व्यवहार उचल खातील. धार्मिक कार्यात मन रमेल.
मकर - घर, शेती, खरेदीचे मनसुबे रचले जातील. चांगले प्रस्ताव समोर येतील. मात्र, सावधानता बाळगा, आर्थिक आवक चांगली राहिल. खर्चाचे प्रमाण वाढेल, नोकरीत थोडी दगदग होईल. घरात किरकोळ कारणावरुन कुरबूर होईल. मुलांच्या मनातील भावना समजून घ्या.
कुंभ - जीनवसाथीच्या मर्जीनुसार वागणे इष्ट ठरेल. काही कारणाने गैरसमज होतील. धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. मालमत्तेच्या कामात यश मिळेल. काहींना भेटवस्तू मिळतील. घरासाठी खर्च करावा लागेल. नोकरीत प्रगती होईल.
मीन - धार्मिक कार्यात सहभागी व्हाल, तीर्थयात्रा घडेल. दूरचे प्रवास घडतील. नोकरीत अनुकूलता राहिल. प्रगतीच्या दिशेने वाटचाल होईल. वादापासून थोडे दूर राहा. खर्चाचे प्रमाण वाढेल. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील.