Horoscope - December 2, 2020 | राशीभविष्य - २ डिसेंबर २०२०, घर, वाहन इत्यादींची कागदपत्रे सांभाळून ठेवा

राशीभविष्य - २ डिसेंबर २०२०, घर, वाहन इत्यादींची कागदपत्रे सांभाळून ठेवा

मेष -  विचारांच्या गतिशीलतेमुळे द्विधा मनःस्थिती जाणवेल असे श्रीगणेश सांगतात. निर्णयाप्रत येऊ शकणार नाही. आजचा दिवस नोकरी धंद्यात स्पर्धामय राहील आणि त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न कराल. आणखी वाचा 

वृषभ - आज द्विधा स्थितीतील व्यवहार आपणाला अडचणीत आणेल. महत्त्वाचा वेळ त्यासाठी खर्च करावा लागेल. आपला हट्टी स्वभाव सोडा अन्यथा कोणाशी चर्चा, विवादा दरम्यान संघर्ष होईल. आज आखलेला प्रवासाचा बेत पूर्ण होणार नाही. आणखी वाचा 

मिथुन -  श्रीगणेश सांगतात की आजच्या दिवसाचा प्रारंभ शरीर आणि मनाच्या टवटवीतपणामुळे चांगला होईल. घरात किंवा मित्र आणि कुटुंबीयांसमवेत बाहेर मनपसंत भोजनाचा आनंद लुटाल. सुंदर कपडे परिधान करून बाहेर जाल.  आणखी वाचा 

कर्क -  श्रीगणेश सांगतात की आज जास्त खर्च होण्याचा दिवस आहे. कौटुंबिक वातावरण पण फारसे समाधानकारक राहणार नाही. कुटुंबातील व्यक्तींशी मतभेदाचे प्रसंग येतील. मनात निर्माण होणार्‍या अनिश्चिततेमुळे मानसिक अस्वास्थ्य राहील. आणखी वाचा 

सिंह - कोणत्याही गोष्टीत खंबीर मनाने निर्णय घेऊ न शकल्याने चालून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही असे श्रीगणेश सांगतात. मन विचारांत अडकून पडेल. मित्रांकडून व विशेषतः स्त्रीवर्गाकडून लाभ होईल.  आणखी वाचा 

कन्या -  सांप्रतकाली नव्या कामासंदर्भातील नियोजन योग्य प्रकारे करू शकाल. व्यापारी आणि नोकरदार यांना आजचा दिवस लाभदायक ठरेल असे श्रीगणेश सांगतात. वरिष्ठ अधिकार्‍यांच्या कृपेमुळे बढतीचे योग संभवतात. आणखी वाचा 

तूळ -  आज नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांची नाराजी सहन करावी लागेल, असे गणेशजी सांगतात. व्यवसायामध्ये अडचणी येतील. संततीबाबत चिंता निर्माण होईल. दूरच्या प्रवासाचे नियोजन होईल. 

वृश्चिक-  सध्या शांत राहून वेळ घालवा असे श्रीगणेश सांगतात. रागावर नियंत्रण ठेवा. अनैतिक कामांपासून दूर राहा. नवे संबंध विचारपूर्वक प्रस्थापित करा. जास्त पैसे खर्च झाल्याने आर्थिक चणचण भासेल. आणखी वाचा 

धनु -  आज बौद्धिक आणि तार्किक विचार विनिमयासाठी दिवस चांगला. सामाजिक सन्मान मिळेल. मित्रांशी मुलाखात होईल. त्यांच्या सोबत हिंडणे- फिरणे वा मनोरंजक स्थळी जाण्याचा योग येईल. आणखी वाचा 

मकर -  आज व्यापार धंद्यात मोठे यश मिळेल पण कायद्याच्या कचार्‍यात सापडू नका एवढी दक्षता घ्या. व्यापार उद्योगाच्या दृष्टीने भावी योजना सुफळ होतील. पैशाच्या देवाण- घेवाणीचा व्यवहार व्यवस्थित पार पडेल. आणखी वाचा 

कुंभ -  श्रीगणेश सांगतात की आज बौद्धिक क्षमता, लेखनकार्य आणि नवनिर्मिती व्यवस्थित पूर्ण करू शकाल. विचार एकाच गोष्टीवर स्थिर राहणार नाही. सातत्याने बदल होत राहील.  आणखी वाचा 

मीन - श्रीगणेश आपणाला सूचना देतात की घर, वाहन इत्यादींची कागदपत्रे सांभाळून ठेवा. घरातील वातावरण बिघडू नये यासाठी वाद-विवाद टाळा. आईचे आरोग्य बिघडेल. आणखी वाचा 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Horoscope - December 2, 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.