शहरं
Join us  
Trending Stories
1
एका गंभीर विषयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र; काय घडलं?
2
काय आहे 'SHANTI' विधेयक? केंद्र सरकानं दिली मंजुरी; खासगी सेक्टरसाठी उघडले अणुऊर्जा क्षेत्र
3
अमेरिकेकडून भारतावर लावलेलं टॅरिफ हटवण्याची मागणी; शुल्काला थेट आव्हान, खासदारांनी संसदेत मांडला प्रस्ताव
4
Crime: "मला प्रेग्नंट कर नाही तर,..." हे ऐकताच प्रियकर भडकला; विवाहित प्रेयसीला कायमचं संपवलं
5
SBIनं ग्राहकांना दिली खूशखबर! स्वस्त केले कर्जाचे व्याजदर; ५० लाखांवर २० वर्षात किती बचत होईल?
6
चार्टर्ड प्लेनमधील भाजपा नेत्यांच्या सेल्फीनं अमित शाह संतापले; देवेंद्र फडणवीसांनीही सुनावले
7
जागावाटपाचे अशांत टापू, एकत्र येण्यास अडचणींचा डोंगर; महायुतीमधील वादाचे मुद्दे
8
काय आहे मोट इनव्हेस्टिंग; बर्गर किंगमध्ये काम करणाऱ्यानं यातून कशी बनवली कोट्यवधींची संपत्ती
9
Vaibhav Suryavanshi: "मी बिहारचा आहे, मला काही फरक पडत नाही"; वादळी खेळीनंतर वैभव सूर्यवंशी असं का म्हणाला?
10
धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
11
पाकिस्तानी अभिनेत्रीची 'धुरंधर'साठी झालेली निवड, ऐनवेळी नाकारला सिनेमा? रणवीरसोबतचे फोटो शेअर करून झाली ट्रोल
12
भारतीय लष्कारात इंटर्नशिप करण्याची संधी, ७५ हजार मिळणार मानधन; २१ डिसेंबरपर्यंत अर्ज करा
13
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
14
Mumbai: मुंबई लोकलमध्ये जोडप्याची दादागिरी, दिव्यांग प्रवाशांशी गैरवर्तन, व्हिडीओ व्हायरल
15
आजचे राशीभविष्य, १३ डिसेंबर २०२५: 'या' राशीसाठी आज आर्थिक फायद्याचा दिवस; यश, किर्ती वाढेल
16
मित्रांकडून मागवला विषारी साप, सर्पदंशाने पत्नीची केली हत्या; ३ वर्षांनी झाला उलगडा, पतीला अटक
17
Tarot Card: येत्या आठवड्यात परिस्थिती कशीही असो, मनःस्थिती उत्तम ठेवा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
18
संन्यस्त राजकारणी ! लातूरचे नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचा राजकीय प्रवास
19
आव्हाड-पडळकरांच्या कार्यकर्त्यांना दोन दिवस कारावासाची शिक्षा, पावसाळी अधिवेशनातील राडा; गंभीर दखल
20
चार वर्षांत शेतीभोवती दिसणार पक्क्या पाणंद रस्त्यांचे जाळे; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना मंजूर
Daily Top 2Weekly Top 5

या निवडणुकीत तरी काॅंग्रेस उघडणार का खाते?; यापूर्वी भाजपने जिंकल्या सर्व २५ जागा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2024 08:39 IST

मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, प्रदेशाध्यक्ष सी. पी. जोशी यांच्यासह अन्य नेते झटून प्रचार करीत आहेत.

विलास शिवणीकर

जयपूर : राजस्थानात गत दोन लोकसभा निवडणुकीत भाजपने सर्व २५ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे या जागा कायम ठेवण्याचे आव्हान भाजपपुढे आहे. तर, काँग्रेस यंदा तरी खाते उघडणार काय, याबाबत उत्सुकता आहे.

मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, प्रदेशाध्यक्ष सी. पी. जोशी यांच्यासह अन्य नेते झटून प्रचार करीत आहेत. दुसरीकडे प्रदेश काँग्रेसनेही कंबर कसली आहे. गत दोन लोकसभा निवडणुकीतील पराभवापासून धडा घेत बहुतांश जागेवर काँग्रेसने नवीन चेहरे दिले आहेत. निवडणुकीच्या रणनीतीत बदल केला आहे. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांना संघटनेचा आणि निवडणुकीचा दीर्घ अनुभव आहे. यंदा संघटनेसोबतच सरकारमध्ये ते असल्यामुळे निवडणूक व्यवस्थापनाची जबाबदारी त्यांच्यावरच आहे. राज्यासाठी स्टार प्रचारक म्हणून त्यांचाच चेहरा आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत तीनदा मुख्यमंत्री राहिलेले आहेत. सध्या ते आमदार आहेत. राज्याची जबाबदारी गेहलोत यांच्याकडेच आहे. पण, त्यांच्याच जिल्ह्यात जोधपूरमध्ये पक्षाच्या उमेदवाराला जिंकून आणण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे. 

केंद्रीय मंत्र्यांच्या कामगिरीवर लक्षकेंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत सध्या जोधपूरमधून खासदार आहेत. ते दोनदा निवडणूक जिंकले आहेत. तिसऱ्यांदा पक्षाने त्यांना संधी दिली आहे. केंद्रीय मंत्री अर्जुनराम मेघवाल हे सातत्याने बिकानेरमधून लोकसभा निवडणूक लढत आलेले आहेत. पश्चिम राजस्थानातील भाजपचा ते एक मोठा चेहरा आहेत. केंद्रीय मंत्री कैलाश चौधरी बाडमेर- जैसलमेरचे खासदार आहेत. विधानसभा निवडणुकीत बाडमेर जिल्ह्यात दोन ठिकाणी अपक्ष विजयी झाले आहेत. एका आमदाराला पक्षाने नंतर सोबत घेतले आहे; पण अन्य अपक्ष आमदाररवींद्रसिंह भाटी यांनी लोकसभा निवडणूक लढण्याची घोषणा करीत चौधरी यांची चिंता वाढविली आहे

प्रदेशाध्यक्षांसमोर दुहेरी आव्हानnभाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. पी. जोशी चित्तोडगडमधून खासदार आहेत. यंदा पुन्हा निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्या नेतृत्वातच पक्ष विधानसभा निवडणूक जिंकला आहे.nजोशी यांच्यापुढे दुहेरी आव्हान आहे. ते स्वत:ही रिंगणात आहेत आणि इतर उमेदवारांच्या निवडणुकीच्या व्यवस्थापनाची जबाबदारी त्यांच्यावर आहे.

टॅग्स :rajasthan lok sabha election 2024राजस्थान लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेस