शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदावरून भाजपात ट्विस्ट; वसुंधरा राजेंनी ठेवली एक अट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 13:42 IST

३ डिसेंबरला राजस्थान निवडणुकीचा निकाल लागून बरेच दिवस झाले तरी अद्यापही मुख्यमंत्री कोण यावर चर्चा सुरू आहे

नवी दिल्ली - भारतीय जनता पार्टीतील वजनदार नेत्या आणि राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी भाजपाकडे अनोखी मागणी केली आहे. केंद्रीय नेतृत्वाने मला १ वर्षासाठी राजस्थानचं मुख्यमंत्री बनवावं अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यानंतर स्वत:आपण हे पद सोडू असं वसुंधरा राजेंनी भाजपा नेतृत्वाला सांगितल्याची माहिती सूत्रांकडून आली आहे. परंतु पक्षाकडून वसुंधरा राजे यांना विधानसभा अध्यक्ष बनवण्याची ऑफर दिली होती. मात्र पक्षाचा हा प्रस्ताव वसुंधरा राजेंनी नाकारला असं सांगितले जात आहे. 

३ डिसेंबरला राजस्थान निवडणुकीचा निकाल लागून बरेच दिवस झाले तरी अद्यापही मुख्यमंत्री कोण यावर चर्चा सुरू आहे. वसुंधरा राजे यांनी भाजपा अध्यक्ष जे.पी नड्डा यांच्याकडेच मुख्यमंत्री पदाची मागणी केली आहे. तर नड्डा यांनी वसुंधरा राजेंना आमदारांसोबत वेगळी चर्चा न करण्याचा सल्लाही दिला. वसुंधरा राजे यांनी रविवारी रात्री जे.पी.नड्डा यांच्याशी फोनवरून संवाद साधला. तेव्हा नड्डा यांनी त्यांना स्पीकर बनण्याची ऑफर केली त्यावर वसुंधरा राजेंनी नकार दिला. 

बहुमताचा आकडा पार केला, तरी मुख्यमंत्री चेहऱ्यासाठी विलंब का?राजस्थान विधानसभा निवडणुकीत भाजपाने ११५ जागांवर विजय मिळवत बहुमताचा जादूई आकडा पार केला. परंतु एक आठवड्यानंतरही भाजपाकडून या राज्यात मुख्यमंत्री चेहरा देऊ शकली नाही. मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा करताच भाजपात पक्षांतर्गत नाराजी उफाळून येण्याची भीती नेतृत्वाला आहे. त्याचा परिणाम भाजपाला भोगावा लागू शकतो. त्यामुळे भाजपाने ३ पक्ष निरिक्षक राजस्थानात पाठवले. त्यात केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, खासदार सरोज पांडे आणि राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांचा समावेश आहे. 

मंगळवारी भाजपा आमदारांची बैठकभाजपा नेतृत्वाने पाठवलेल्या निरिक्षकांकडून मंगळवारी आमदारांची बैठक होणार आहे. मंगळवारी सकाळी १० वाजता या बैठकीत राजस्थानच्या पुढील मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होऊ शकते. आमदारांसोबत चर्चा करून निरीक्षक अहवाल केंद्रीय नेतृत्वाकडे देतील. त्यानंतर मुख्यमंत्रिपदाची निवड होईल. राजस्थानात वसुंधरा राजे यांचा दबदबा आहे. त्या २ वेळा मुख्यमंत्री राहिल्या आहेत. निकालानंतर वसुंधरा राजेंनी आमदारांसोबत बैठका घेत त्यांचे महत्त्व वाढवले आहे. त्यामुळे राजस्थानात वसुंधरा राजेंना पुन्हा मुख्यमंत्रिपदाची संधी मिळणार का हे पाहणे गरजेचे आहे. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानRajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकBJPभाजपा