उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 16:14 IST2025-05-06T16:12:39+5:302025-05-06T16:14:05+5:30
कोचिंग इन्स्टिट्यूटकडून माहिती मिळताच कुन्हाडी पोलीस आणि स्टुडंट सेल टीमने वेळेत घटनास्थळी पोहोचून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न हाणून पाडला.

उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
राजस्थान येथील कोटामध्ये पुन्हा एकदा पोलिसांनी एका विद्यार्थ्याला आत्महत्या करण्यापासून वाचवले. नीट परीक्षेला उशीर झाल्याने पेपर देता न आल्याने मध्य प्रदेशातील एका विद्यार्थ्याने आत्महत्येचा निर्णय घेतला. कोचिंग इन्स्टिट्यूटकडून माहिती मिळताच कुन्हाडी पोलीस आणि स्टुडंट सेल टीमने वेळेत घटनास्थळी पोहोचून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न हाणून पाडला. विद्यार्थ्याचे समुपदेशन करण्यात आले. त्यानंतर त्याला पालकांसह घरी पाठवण्यात आले.
संबंधित विद्यार्थी गेल्या एक वर्षापासून कोटामध्ये नीट यूजी परीक्षेची तयारी करत होता. पंरतु, परीक्षेच्या दिवशी तो परीक्षा केंद्रावर एक तास उशिरा पोहोचला. त्यामुळे त्याला परीक्षा देता आली नाही. विद्यार्थ्याने त्याच्या कोचिंग इन्स्टिट्यूटशी संपर्क साधला आणि त्याच्यासोबत घडलेला त्यांना सांगितला. यानंतर त्याचा फोन बंद झाला. विद्यार्थी आत्महत्येचे पाऊल उचलू शकतो, अशी भीती कोचिंग इन्स्टिट्यूटने व्यक्त केली. त्यांनी ताबडतोब कुन्हाडी पोलिसांत संपर्क साधला.
माहिती मिळताच पोलिसांनी आणि स्टुडंट सेलने विद्यार्थ्याचा मोबाईल फोन बंद पोलिसांना त्याचा शोधून काढले. त्यानंतर विद्यार्थ्याचे समुपदेशन करण्यात आले. पोलिसांनी विद्यार्थ्याच्या पालकांशी संपर्क साधला आणि त्यांना कोटा येथे बोलावून घेतले. कुटुंबातील सदस्य आल्यानंतर विद्यार्थ्याला त्यांच्यासोबत सुरक्षितपणे घरी पाठवण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थी गेल्या एक वर्षांपासून नीट परीक्षेची तयारी करत आहे. रविवारी त्याचा पेपर होता. परंतु,तो परीक्षेसाठी उशिरा पोहोचल्यामुळे खूप तणावात होता. माहिती मिळताच, स्टुडंड सेलची टीम ताबडतोब निघून गेली. स्टुडंड सेलने विद्यार्थ्याशी बोलून त्याला समजावून सांगितले. विद्यार्थ्याने परीक्षा चुकल्याबद्दल कोचिंग इन्स्टिट्यूटला कळवले. विद्यार्थी तणावात असल्याने त्याच्या कोचिंग इन्स्टिट्यूटने याबाबत पोलिसांना माहिती दिली. यावर्षी जानेवारीपासून आतापर्यंत स्टुडंट सेलने ५ ते ६ विद्यार्थ्यांचे प्राण वाचवले आहेत.