शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

आईनं मुलाचा मुलीप्रमाणे श्रृंगार केला, आनंदात फोटो काढले अन् संपूर्ण कुटुंबाने एकाच वेळी जीवन संपवले! नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 01:08 IST

मंगळवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. या कुटुंबाने असे टोकाचे पाऊल का उचलले? याचा पोलीस तपास करत आहेत.

राजस्थानच्या बाडमेरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका महिलेने आपल्या लहाण मुलाला, दागिने घालून आणि मेकअप करून, त्याचा एखाद्या मुली प्रमाणे श्रृंगार केला. यानंतर या चार सदस्यांच्या कुटुंबाने सामूहिक आत्महत्या करत जीवन संपवले. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. या कुटुंबाने असे टोकाचे पाऊल का उचलले? याचा पोलीस तपास करत आहेत.

शिवलाल मेघवाल (35 वर्ष), त्याची पत्नी कविता (32 वर्ष), दो मुलं बजरंग (9 वर्ष) आणि रामदेव (8 वर्ष), असे सामूहिक आत्‍महत्‍या करणऱ्यांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्या करण्यापूर्वी कविताने तिचा धाकटा मुलगा रामदेव याला मुलीचे कपडे घातले. दागिने घातले, डोळ्यात काजळ आणि कपाळावर गंध लावले, त्याचे फोटो काढले. यानंतर संपूर्ण कुटुंबाने पाण्याच्या टाकीत उडी घेत आत्महत्या केली.यानंतर, बुधवारी सकाळी पाण्याच्या टाकीतून मृतदेह बाहेर काढण्यात आले.

असं आहे संपूर्ण प्रकरम -पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली. बुधवारी सकाळी कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत पाण्याच्या टाकीतून मृतदेह बाहेर काढण्यात आले. यानंतर, या जोडप्याच्या कुटुंबाला आणि नातेवाईकांना घटनेची माहिती देण्यात आली. यासंदर्भात बोलताना पोलिस उपअधीक्षक (डीएसपी) मनराम गर्ग म्हणाले, शिवलालच्या धाकट्या भावाने फोन त्याला केला. मात्र, कुणाशीही संपर्क होऊ शकला नाही. यानंतर, त्याने एका शेजाऱ्याला बघण्यासाठी पाठवले. मात्र, त्यलाही काहीच प्रतिक्रिया मिळाली नाही. यानंतर, त्याने पोलिसांना सूचना दिली. आता पोलिस प्रकरमाचा तपास करत आहेत. सुसाईड नोटमध्ये काय? -घरातून शिवलालच्या हस्ताक्षरातील सुसाईड नोट सापडली. हे तीन पानांची ही नोट २९ जून रोजी लिहिले गेली आहे. सुसाईड नोटमध्ये शिवलालने हे पाऊल उचलल्याबद्दल तीन जणांना जबाबदार धरले आहे, त्यांपैकी एक शिवलालचा धाकटा भाऊ आहे.

सुसाईड नोटमध्ये जमिनीच्या वादावरून सुरू असलेल्या कौटुंबिक कलहाचा उल्लेख आहे. तसेच, चौघांचाही अंत्यसंस्कार त्यांच्या घरासमोरच करावा, असेही सुसाईड नोटमध्ये लिहिण्यात आले आहे. याच वेळी, शिवलालला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (PMAY) मंजूर झालेल्या निधीचा वापर करून एक वेगळे घर बांधण्याची इच्छित होते. मात्र, त्याच्या आईचा आणि भावाचा त्याला विरोध होता, असे कविताच्या काकांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानFamilyपरिवारPoliceपोलिस