शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

पायलट-गहलोत वादाचा काँग्रेसला फटका; 20 जागांवर अतिशय कमी फरकाने पराभव

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2023 3:54 PM

कुठे 974 तर कुठे फक्त 321 मतांनी काँग्रेस उमेदवाराचा पराभव.

Rajasthan Election 2023: काल(3 डिसेंबर) रोजी मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. यात काँग्रेसने आपल्या हातून राजस्थान आणि छत्तीसगड गमावले. राजस्थानमध्ये 2018 प्रमाणे सचिन पायलट आणि अशोक गेहलोत यांच्यात वाद नसता, तर  राजस्थानची परंपरा बदलू शकली असती. पायलट आणि गेहलोत यांच्यातील मतभेदामुळे राज्यातील 20 जागांवर काँग्रेसचा पराभव झाला. 

पायलट आणि गेहलोत यांच्यातील वादामुळे काँग्रेसला 10 हजारांपेक्षा कमी फरकाने 14 जागा गमवाव्या लागल्या. या जागांमध्ये ममता भूपेश यांच्या सिकराई, प्रमोद जैन भाया यांच्या अंता, विश्वेंद्र सिंग यांच्या डीग-कुम्हेर आणि वाजिब अली यांच्या नगर जागेचा समावेश आहे. गेहलोत यांच्याशी असलेल्या वादाणामुळे पायलट कॅम्पचेही नुकसान झाले आहे. पायलट गटाला नशिराबाद, विराटनगर आणि चाकसूमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.

राज्यातील निकालया 20 जागा काँग्रेसने जिंकल्या असत्या तर राज्याचे समीकरण वेगळे झाले असते, असे जाणकारांचे मत आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानमध्ये भारतीय जनता पक्षाने 115, काँग्रेसने 69, BAP 3, BSP 2 आणि RLP 1 जागा जिंकली आहे. तसेच, राज्यातील 8 जागा अपक्षांकडे गेल्या आहेत. त्यापैकी 6 अपक्षांनी भारतीय जनता पक्षाविरोधात बंडखोरी करुन निवडणूक लढवली होती.

पक्षांतर्गत कलहामुळे पराभवअंता आणि छाबरा-बारण जिल्ह्यांतील या दोन जागांवर काँग्रेसचा पराभव अंतर्गत राजकारणामुळे झाला. गेहलोत सरकारचे मंत्री प्रमोद जैन भाया अंता मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. भय्या यांचा भाजपच्या कंवरलाल मीणा यांच्याकडून 5861 मतांनी पराभव झाला. तसेच पक्षाने माजी आमदार करण सिंह यांना छाबरा येथे उमेदवारी दिली होती. करण सिंग यांचाही 5108 मतांनी पराभव झाला. येथून भाजपचे प्रताप संघवी विजयी झाले आहेत.

दोन्ही जागांवर काँग्रेसच्या उमेदवारांच्या पराभवाचे मुख्य कारण म्हणजे सचिन पायलट गटाचे नरेश मीणा. या दोन्ही जागा मीणाचे वर्चस्व मानल्या जातात. निवडणुकीपूर्वी नरेश यांनी प्रमोद भायाविरोधात बंडखोरी केली होती. नरेश अंता किंवा छाबरा सीटवरून तिकीट मागत होते, पण त्यांना तिकीट मिळाले नाही. यानंतर त्यांनी मीणाने समाजाची बैठक बोलावून छाबरा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली. नरेश छाबरा मतदारसंघातून विजयी झाले नाहीत, मात्र त्यांना 41 हजार मते मिळाली. नरेश यांच्यामुळे मीना मतदारांचे अंता जागेवरही ध्रुवीकरण झाले.

अतिशय कमी परकाने पराबवपद्माराम यांचा 1428 मतांनी पराभव झाला. पद्माराम यांच्या पराभवाला स्थानिक समीकरणेही कारणीभूत आहेत. दिडवाना येथून अपक्ष युनूस खान यांनी काँग्रेसच्या चेतन दुडी यांचा 2392 मतांनी पराभव केला.  याशिवाय, हवामहल मतदारसंघात भाजपच्या बालमुकुंद आचार्य यांनी काँग्रेसच्या आरआर तिवारी यांचा 974 मतांनी पराभव केला आहे. तसेच, कोटपुतलीमधून मंत्री राजेंद्र यादव यांचा भाजपच्या हंसराज पटेल यांच्याकडून 321 मतांनी पराभव झाला. नगरमधून वाजीब अली यांना 1531 मतांनी पराभव स्वीकारावा लागला. नसीराबादमध्येही शिवप्रकाश गुर्जर यांचा 1135 मतांनी पराभव झाला आहे. याशिवाय, इतर अनेक जागा आहेत, जिथे काँग्रेसचा भाजप उमेदवाराने अतिशय कमी फरकाने पराभव केला आहे.

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकcongressकाँग्रेसAshok Gahlotअशोक गहलोतSachin Pilotसचिन पायलटRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपा