शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

पीओके आपोआप भारतात सामील होईल, थोडी प्रतीक्षा करा - केंद्रीय मंत्री व्हीके सिंह

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 11:58 AM

भाजपच्या परिवर्तन संकल्प यात्रेच्या संदर्भात जनरल व्हीके सिंह राजस्थानमध्ये पोहोचले आहेत.

पाकव्याप्त काश्मीर (पीओके) आपोआप भारतात सामील होईल, यासाठी तुम्हाला थोडी प्रतीक्षा करावी लागेल, असे विधान केंद्रीय मंत्री आणि माजी लष्करप्रमुख जनरल व्हीके सिंह (निवृत्त) यांनी केले आहे. दरम्यान, राजस्थानमधील एका कार्यक्रमादरम्यान, त्यांना विचारण्यात आले की पीओकेमधील लोक भारतात विलीन होण्याची मागणी करत आहेत. या मुद्द्यावर भाजपची भूमिका काय आहे? यावर उत्तर देताना व्हीके सिंह यांनी पीओकेच्या भारतात विलीनीकरणाबाबत भाष्य केले.

यावर्षी राजस्थानमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर आयोजित भाजपच्या परिवर्तन संकल्प यात्रेच्या संदर्भात जनरल व्हीके सिंह राजस्थानमध्ये पोहोचले आहेत. राजस्थानमधील दौसा येथे पत्रकार परिषदेत भाजप खासदार आणि माजी लष्करप्रमुख जनरल व्हीके सिंह यांना विचारण्यात आले की, पीओकेचे शिया मुस्लिम भारतासोबतची सीमा उघडण्याबाबत बोलत आहेत का? यावर तुम्हाला काय म्हणायचे आहे? यावर व्हीके सिंह म्हणाले, "पीओके आपोआप भारतात विलीन होईल. तुम्हाला थोडी प्रतीक्षा करावी लागेल." 

व्हीके सिंह यांनी भारताच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या G20 शिखर परिषदेबद्दलही भाष्य केले. ते म्हणाले की, भारतात ज्या प्रकारे G20 चे यशस्वी आयोजन करण्यात आले आहे, त्यामुळे जागतिक स्तरावर भारताची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. भारताने जगात आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. तसेच, G20 सारखा कार्यक्रम यापूर्वी आयोजित केला गेला नव्हता आणि कोणत्याही देशाने विचारही केला नसेल की, भारत अशी परिषद आयोजित करू शकेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने जगात आपले कर्तृत्व सिद्ध केले आह, असेही व्हीके सिंह म्हणाले.

पीओकेमध्ये पाकिस्तानच्या विरोधात आहेत लोककाश्मिरी कार्यकर्ते शब्बीर चौधरीने शेअर केलेल्या व्हिडिओनुसार, पाकव्याप्त काश्मीरमध्ये सध्या मोठ्याप्रमाणात पाकिस्तानविरोधी निदर्शने होत आहेत. पीओकेमधील शहरे आणि गावांमधील लोक अन्न टंचाई, गगनाला भिडणारी महागाई आणि उच्च करांच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. जम्मू-काश्मीरचे कार्यकर्ते शब्बीर चौधरी यांनी सर्वसामान्यांची चिंता वाढवली आहे. संपूर्ण प्रदेशात होत असलेल्या मोठ्या निषेधासाठी त्यांनी पाकिस्तानला जबाबदार धरले आहे.

टॅग्स :VK Singhव्ही के सिंगRajasthanराजस्थानBJPभाजपाPOK - pak occupied kashmirपीओके