शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
2
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
3
अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
4
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
5
Robert Kiyosaki Alert: 'लाखो लोक उद्ध्वस्त होतील, एक मोठा विनाश येणार...' ‘या’ दिग्गजाचा भयानक इशारा, सुटण्याचा मार्ग काय?
6
Stock Market Today: शेअर बाजाराची आजही सुस्त सुरुवात; ऑटो-FMCG शेअर्समध्ये विक्री
7
माजी क्रिकेट प्रशिक्षकाची हत्या, हल्लेखोरांनी पत्नी आणि सुनेसमोरच झाडल्या गोळ्या  
8
प्रियकरासमोरच गाडीतून खेचत नेलं, विमानतळाजवळ सामूहिक अत्याचार; पोलिसांकडून आरोपींचा एन्काऊंटर
9
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
10
मेट्रोत पुन्हा तांत्रिक बिघाड; प्रवाशांना गाडीतून उतरवले; कार्यालय सुटण्याच्या वेळीच गोंधळ
11
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
12
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
13
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
14
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
15
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
16
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
17
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
18
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
19
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
20
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य

बघतायना कसा 'चिरडतोय'! योगी आदित्यनाथ यांनी राजस्थानात केली इस्रायलची 'तारीफ', स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 17:13 IST

"अराजकता, गुंडगिरी आणि दहशतवाद हा सुसंस्कृत समाजासाठी सर्वात मोठा कलंक."

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजस्थानात बोलताना इस्रायलने हमासला दिलेल्या प्रत्युत्तराचे कौतुक केले आहे. त्यांनी काँग्रेसवरही लांगूलचालनाच्या राजकारणाचा आरोप केला. या शिवाय, उत्तर प्रदेशात होत असलेल्या बुलडोझर अँक्शनचाही उल्लेख केला. तसेच, तालिबानी मानसिकतेचा पराभव होईल आणि राष्ट्रवादाचा विजय होईल, असेही योगी यांनी म्हटले आहे. ते खासदार बाबा बालक नाथ यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तिजारा येथे पोहोचले होते.

योगी आदित्यनाथ म्हणाले, 'मला सांगण्यात आले आहे की, काँग्रेसने तिजारा विधानसभा मतदारसंघात ज्या व्यक्तीला पाठवले आहे. ती स्वत:बद्दल मोठ-मोठ्या उपमा लावते. बजरगंबलींची गदा हाच तालिबानवरील उपचार आहे. आपण बघत आहात ना, सध्या इस्रायल गाझातील तालिबानी मानसिकता कशा पद्धतीने चिरडण्याचे काम करत आहे. अचून निशाणा मारत.' महत्वाची गोष्ट म्हणजे, काँग्रेसने बाबा बालक नाथ यांच्या विरोधात तिजारा येथून मुस्लीम उमेदवार इम्रान खान यांना तिकीट दिले आहे. 

योगी म्हणाले, "अराजकता, गुंडगिरी आणि दहशतवाद हा सुसंस्कृत समाजासाठी सर्वात मोठा कलंक आहे. मात्र, व्होटबँकेचे राजकारण जेव्हा दहशतवाद, गुंडगिरी आणि अराजकतेसोबत जोडले जाते, तेव्हा एक गरीब, एक निष्पाप, महिला, व्यापारी आणि संपूर्ण सुसंस्कृत समाजाला दोका निर्माण होतो. एवढेच नाही, तर कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून योगींनी गेहलोत सरकारला कोंडीत पकडले आणि पंतप्रधान मोदींच्या कामाचे कौतुक केले.

...अन् काश्मीर आणि अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा सुटला -राजस्थान राज्याचा एक गौरवशाली इतिहास आहे. मात्र, ह्या इतिहासाला कंलक लावण्याचे काम काँग्रेसकडून होत आहे. देशातील काश्मीरची समस्याही काँग्रेसमुळेच निर्माण झाली. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी कलम ३७० हटवून समस्या सोडवली. यामुळे दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले. आता दहशतवाद कायमचा नष्ट झाला आहे, असे योगींनी म्हटले. योगींनी यावेळी अयोध्येतील राम मंदिराबद्दलही भाष्य केले. काँग्रेसने राम मंदिराच्या मुद्द्यावरील वादावर कधीच तोडगा काढला नाही. मात्र, मोदी आणि योगी येताच अयोध्येतील राम मंदिराचा मुद्द्यावरही सुटला, असेही योगी यावेळी म्हटले.  

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्धTerrorismदहशतवादRajasthanराजस्थानBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी