शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ११ वाजेपर्यंत कुठे किती झाले मतदान?
2
राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: उद्या १२ वीचा निकाल जाहीर होणार
3
Video - तरुणाने 8 वेळा केलं मतदान, पोलिंग पार्टी सस्पेंड; राहुल गांधींनी व्यक्त केला संताप
4
ऑनलाईनही पैशांचं वाटप होतंय; उद्धव ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांचा गंभीर आरोप
5
World Record! काय भारी धावली राव; भारताच्या लेकीनं रचला इतिहास, जिंकलं सुवर्ण
6
Fact Check: अखिलेश यादव PM मोदींना भेटले? १० वर्ष जुना व्हिडिओ व्हायरल; जाणून घ्या सत्य
7
...म्हणून शरद पवारांनी अचानक यू टर्न घेतला; मुख्यमंत्रिपदाची डील? आणखी एक नवा दावा
8
महाराष्ट्राच्या संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही; संजय राऊतांची जळजळीत टीका
9
ख्रिस गेल पुढच्या IPL मध्ये पुन्हा खेळताना दिसणार? विराटच्या VIDEO नंतर चर्चांना उधाण
10
हेलिकॉप्टर अपघातात इराणचे राष्ट्रपती रईसी यांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्र्यांसह राज्यपालांनीही गमावला जीव
11
'मुलाला सांभाळता येत नाही'; नेटकऱ्यांच्या कमेंट्स जिव्हारी लागल्या, 'त्या' बाळाच्या आईने स्वतःला संपवलं
12
गौरव मोरे ते स्पृहा जोशी; मराठमोळ्या या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
13
PM Modi Share Market : ४ जूननंतर शेअर बाजार नव्या शिखरावर असेल, PM मोदींनी गुंतवणूकदारांना दिला अनोखा सल्ला
14
उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा
15
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
16
'ही मॅन'नेही बजावला मतदानाचा हक्क, ८८ वर्षीय धर्मेंद्र पोहोचले मतदान केंद्रावर; Video व्हायरल
17
नंदुरबारचा रहिवासी.. गुजरातमध्ये GST अधिकारी, साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; कुणीच केला नाही तपास
18
Som Pradosh 2024: नशिबाची साथ मिळत नसेल तर आज सोम प्रदोष व्रत करा,भाग्य बदलेल; वाचा व्रतविधी!
19
Nrusinha Jayanti 2024: २१ मे नृसिंह जयंती: भगवान विष्णुंच्या नृसिंह अवतारामागे दडलेले रहस्य जाणून घ्या!
20
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस

सी.पी. जोशी यांना यंदा काँग्रेसचे तगडे आव्हान; चित्तौडगडमध्ये बाजी कोण मारणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 7:54 AM

भारत आदिवासी पार्टीचे मांगीलाल मीणा तसेच बसपा व अन्य काही अल्पसंख्याक उमेदवाराचा फटका काँग्रेसच्या उमेदवाराला बसू शकतो.

विलास शिवणीकरचित्तौडगड : राजस्थानातील चित्तौडगड मतदारसंघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. पी. जोशी विजयाची हॅट्ट्रिक करणार काय? याबाबत उत्सुकता आहे. काँग्रेसने ज्येष्ठ नेते उदयलाल आंजना यांना रिंगणात उतरविल्याने ही लढत तुल्यबळ झाली आहे. 

माजी संरक्षणमंत्री जसवंत सिंह यांचा १९९८ मध्ये आंजना यांनी पराभव केला होता. यंदाची निवडणूक सी. पी. जोशी यांच्यासाठी प्रतिष्ठेची झाली आहे. ते प्रदेशाध्यक्ष असले तरी  मतदारसंघात अडकून पडल्याचे दिसून येत आहे. चित्तौडगड मतदारसंघातील आठपैकी ६ विधानसभा मतदारसंघांत भाजपचे आमदार आहेत. एका जागेवर काँग्रेस आणि एका मतदारसंघात अपक्ष आमदार आहेत. भारत आदिवासी पार्टीचे मांगीलाल मीणा तसेच बसपा व अन्य काही अल्पसंख्याक उमेदवाराचा फटका काँग्रेसच्या उमेदवाराला बसू शकतो.

काय आहेत कळीचे मुद्दे तरुणांसाठी रोजगार, पर्यटनाच्या दृष्टीने मतदारसंघात विकास हे स्थानिक मुद्दे काँग्रेसने प्रचारात उचलून धरले आहेत. या मतदारसंघात गुलाबचंद कटारिया, वसुंधरा राजे आणि चंद्रभान आक्या या ज्येष्ठ नेत्यांचा प्रभाव आहे. मात्र, आक्या आणि सी.पी. जोशी यांच्यातील संघर्ष सर्वश्रूत आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा रोड शो, भाजप नेत्यांचे दौरे त्यामुळे येथील राजकीय वातावरण तापलेले आहे.

२०१९ मध्ये काय घडले ?

सी. पी. जोशी भाजप (विजयी) ९,८२,९४२

गोपाल सिंह शेखावतकाँग्रेस (पराभूत) ४,०६,६९५

टॅग्स :chittorgarh-pcचित्तोडगडrajasthan lok sabha election 2024राजस्थान लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेस