शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
2
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
4
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
5
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
6
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
7
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
8
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
9
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
10
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
11
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
12
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
13
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
14
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
15
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
16
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
17
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
18
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
19
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!

पायलट-गेहलाेत वादानंतर गुर्जर समाजात दुफळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 06:28 IST

मुख्यमंत्री बनविण्याचे वचन माेडल्याची भावना, पाठिंबा देण्यावरून स्थानिकांमध्ये मतभिन्नता

अलवर : काॅंग्रेस नेते सचिन पायलट यांना मुख्यमंत्रिपद न मिळाल्यामुळे राजस्थानातील गुर्जर  याबाबत समाजातील नेत्यांमध्ये पक्षाला पाठिंबा देण्याबाबत मतभिन्नता दिसून येते. गेल्या निवडणुकीनंतर यावेळी हा समाज पायलट यांना मुख्यमंत्री झालेले पाहू इच्छिताे. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनीही प्रचाराच्या शेवटी या मुद्द्यावरून काॅंग्रेसवर टीका केली.

राजस्थानातील २०० पैकी ३५ मतदारसंघ गुर्जरबहुल मानले जातात. अलवरमध्ये सुमारे दीड लाख लाेक या समाजातील आहेत. सचिन पायलट यांच्यावरून या समाजातील मतदार नाराज तर आहेत. मात्र, केवळ काॅंग्रेसच त्यांना मुख्यमंत्री करू शकते, असेही लाेकांचे म्हणणे आहे. समाजातील मतदार नाराज असले तरीही काॅंग्रेसला मत देण्याबाबतच्या निर्णयावर याचा परिणाम हाेणार नाही. भाजप पायलट यांना मुख्यमंत्री बनविणार नाही, असे स्थानिक निवासी अमरसिंह गुर्जर सांगतात. काॅंग्रेसचे सरकार आल्यास पायलट हे मुख्यमंत्री व्हावे, अशी त्यांची इच्छा आहे.

वचनभंगामुळे नाराजीपायलट यांना मुख्यमंत्री न बनवून काॅंग्रेसने वचनभंग केला, असे समाजातील अनेक जण मानतात. गेल्या वेळी याच वचनामुळे समाजाने काॅंग्रेसला मतदान केले हाेते. त्यामुळे यावेळी काॅंग्रेसचे नुकसान हाेणार असून माेठ्या संख्येने गुर्जर मते भाजपला मिळतील, असे मतही अनेकांनी व्यक्त केले.

असाही मतप्रवाहगुर्जर समाज सचिन पायलट यांना नेता मानताे. स्थानिक समस्या साेडविण्यासाठी सचिन पायलट येणार नाही, त्यासाठी स्थानिक नेताच येईल. आमच्या येथे प्रत्यक्ष काम करण्याची क्षमता काेणाकडे आहे, या आधारावर मतदान करू, असाही मतप्रवाह आहे.

विकासकामे पाहूसचिन पायलट तरुणांचा चेहरा आहे. नव्या पिढीचे नेते आहेत. आम्ही नेत्यांनी केलेल्या विकासकामाकडेही पाहून मतदान करू. गुर्जर समाज हताश झालेला नाही, असे या समाजातील लाेक म्हणतात.

मतांचे हाेईल विभाजन?राजस्थानमध्ये पायलट यांनीच पक्ष बळकट केला. त्यानंतरही त्यांना मुख्यमंत्री बनविण्यात आले नाही. यामुळे काॅंग्रेसचे नुकसान हाेईल. समाजातील मते भाजपकडे वळतील, असे स्थानिकांचे मत आहे.

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकSachin Pilotसचिन पायलटElectionनिवडणूकcongressकाँग्रेस