५० हजार विवाहांमुळे, बदलला मतदानाचा मुहूर्त; राजस्थानात २३ ऐवजी २५ नोव्हेंबरला मतदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2023 07:00 IST2023-10-12T06:59:20+5:302023-10-12T07:00:02+5:30
एका निवेदनात आयोगाने म्हटले आहे की, लाेकांची गैरसाेय हाेऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला.

५० हजार विवाहांमुळे, बदलला मतदानाचा मुहूर्त; राजस्थानात २३ ऐवजी २५ नोव्हेंबरला मतदान
नवी दिल्ली : राजस्थानात नोव्हेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात विवाहसोहळे होत आहेत, तसेच सामाजिक कार्यक्रमाची रेलचेल पाहता निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख २३ नोव्हेंबरऐवजी आता २५ नोव्हेंबर अशी केली आहे.
२३ नोव्हेंबरला देव उथनी एकादशी आहे. या दिवशी राज्यात ५० हजार विवाह सोहळे असून याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर होऊ शकतो. हे लक्षात घेता मतदानाची तारीख बदलली आहे.
एका निवेदनात आयोगाने म्हटले आहे की, लाेकांची गैरसाेय हाेऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला.