शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदावरून राजकीय हालचालींना वेग, वसुंधरा राजेंच्या बाजूने जोरदार लॉबिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 16:53 IST

कोटा उत्तरचे पराभूत उमेदवार प्रल्हाद गुंजाळ हे स्वतः वसुंधरा राजे यांच्या बाजूने लॉबिंग करण्यात व्यस्त आहेत. 

राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदावरून राजकीय हालचाली वाढल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या नावावरून अद्याप सस्पेंस आहे. राजस्थानमध्ये उद्या विधीमंडळ पक्षासोबत निरीक्षकांची बैठक होणार आहे. मात्र, यादरम्यान येणाऱ्या बातम्यांवरून येथील नेत्यांच्या बाजूने लॉबिंग सुरू झाल्याचा दावा केला जात आहे. कोटा उत्तरचे पराभूत उमेदवार प्रल्हाद गुंजाळ हे स्वतः वसुंधरा राजे यांच्या बाजूने लॉबिंग करण्यात व्यस्त आहेत. 

दुसरीकडे, राजस्थानचे विरोधी पक्षनेते राहिलेले राजेंद्र राठोड यांनी वसुंधरा राजे यांच्यावर निशाणा साधला आहे. आपल्या नावावर निवडणूक जिंकली असा कोणताही गैरसमज नसावा, राजस्थानमधील विजय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावर मिळाला आहे, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, राजस्थान विधानसभा निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवला आहे. भाजपने 199 पैकी 115 जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला आहे. तेव्हापासून मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याबाबत चर्चा सुरू आहे. 

राजस्थानमध्ये माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, गजेंद्र सिंह शेखावत, सीपी जोशी यांच्यासह अनेक नावे मुख्यमंत्रीपदासाठी दावेदार आहेत. विशेष म्हणजे, यामध्ये वसुंधरा राजे या मुख्यमंत्रीपदाच्या प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत. मात्र, भाजपने अद्याप कोणाच्याही नावाला मान्यता दिलेली नाही. हायकमांडने येथे निरीक्षक पाठवले आहेत. यामध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह सरोज पांडे आणि विनोद तावडे यांचा समावेश आहे. उद्या निरीक्षक आमदारांची बैठक घेऊ शकतात, असे म्हटले जात आहे.

कोटा उत्तरमधून निवडणुकीत पराभूत झालेले प्रल्हाद गुंजाळ हे मुख्यमंत्रीपदासाठी वसुंधरा राजे यांचा प्रचार करत आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,  प्रल्हाद गुंजाळ जयपूरमध्ये पक्षाच्या बड्या नेत्यांची भेट घेत आहेत. तसेच,  प्रल्हाद गुंजाळ हे सातत्याने वसुंधरा राजे यांच्या बाजूने नेत्यांचा पाठिंबा मागत आहेत. यापूर्वी एका आमदाराच्या वडिलांनीही वसुंधरा राजे यांच्या मुलावर आमदारांना रोखल्याचा आरोप केला होता.

राजेंद्र राठोड यांनी वसुंधरा राजेंवर साधला निशाणा राजस्थानमधील विरोधी पक्षनेते राहिलेले भाजपचे ज्येष्ठ नेते राजेंद्र राठोड यांनी वसुंधरा राजे यांच्यावर निशाणा साधला आहे. ते सोमवारी म्हणाले की, राजस्थानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर पक्षाचा विजय झाला आहे. आपल्या नावावर निवडणूक जिंकली असा गैरसमज इथे कोणीही ठेवू नये, असे ते म्हणाले. दरम्यान, हे विधान अशावेळी आले आहे, जेव्हा राजस्थानचा मुख्यमंत्री चेहरा जाहीर होणार आहे. याठिकाणी वसुंधरा राजेंचे समर्थन करणाऱ्या आमदार आणि नेत्यांवरही लॉबिंगचे आरोप झाले आहेत. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानRajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकBJPभाजपाElectionनिवडणूक