शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Bhajan Lal Sharma : कोण आहेत भजनलाल शर्मा? पहिल्यांदाच आमदार अन् थेट राजस्थानचे नवे मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 17:02 IST

Bhajan Lal Sharma : मुख्यमंत्रिपदाच्या प्रबळ दावेदार असलेल्या वसुंधरा राजे यांना बाजूला करून भाजपने अनपेक्षितपणे भजनलाल शर्मा यांच्या नावाची घोषणा केली. 

जयपूर : मध्य प्रदेशाच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केल्यानंतर आता राजस्थानच्या मुख्यमंत्र्याचे नावही भाजपकडून मंगळवारी जाहीर करण्यात आले आहे. पहिल्यांदाच आमदार झालेल्या भजनलाल शर्मा (Bhajanlal Sharma) यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ टाकण्यात आली आहे. मुख्यमंत्रिपदाच्या प्रबळ दावेदार असलेल्या वसुंधरा राजे यांना बाजूला करून भाजपाने अनपेक्षितपणे भजनलाल शर्मा यांच्या नावाची घोषणा केली. 

केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते राजनाथ सिंह यांनी भजनलाल शर्मा यांच्या नावाची घोषणा केली. आता ५६ वर्षीय भजनलाल शर्मा हे राजस्थानचे नवे मुख्यमंत्री असतील. ते सांगानेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले आहेत. ते भाजपाचे प्रदेश सरचिटणीस असून भरतपूरचे रहिवासी आहेत. निवडणुकीदरम्यान भजनलाल शर्मा हे मतदारसंघाबाहेरचे असल्याचा आरोप झाला. तरीही सांगानेरच्या जनतेने त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी केले. 

विधानसभा निवडणुकीत भजनलाल शर्मा यांनी काँग्रेसच्या पुष्पेंद्र भारद्वाज यांचा ४८०८१ मतांनी पराभव केला होता. विद्यमान आमदार अशोक लाहोटी यांचे तिकीट कापून त्यांना उमेदवारी देण्यात आली होती. भाजपा आणि आरएसएसमध्ये दीर्घकाळ काम केले. भजनलाल शर्मा हे ब्राह्मण समाजातील आहेत. राजस्थानमधील लोकसंख्येपैकी सुमारे ७ टक्के लोक ब्राह्मण आहेत. दरम्यान, मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यामुळे भजनलाल शर्मा यांच्या समर्थकांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. 

भजनलाल शर्मा यांच्याविषयी थोडक्यात....- प्रदेश सरचिटणीस या पदावर पक्ष संघटनेत काम.- आमदार म्हणून पहिल्यांदाच निवड .- सांगानेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार.- भजनलाल शर्मा यांचा सांगानेर मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला. - तत्कालीन आमदार अशोक लाहोटी यांचं तिकीट कापून भजनलाल शर्मा यांना संधी.- भजनलाल शर्मा यांना तिकीट दिलं त्याविरोधात लाहोटी समर्थकांनी भाजप मुख्यालयात आंदोलन केलं होतं.

दिया कुमार आणि प्रेमचंद्र बैरवा उपमुख्यमंत्रीपदीयासोबतच राज्यात दोन उपमुख्यमंत्री असतील. दिया कुमार आणि प्रेमचंद्र बैरवा यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड झाली आहे. तसेच, वासुदेव देवनानी राजस्थान विधानसभेचे अध्यक्ष असतील.

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकRajasthanराजस्थानBJPभाजपाElectionनिवडणूक