जयपूरमधील १०० खासगी लॉकर्समध्ये ५० किलो सोने आणि ५०० कोटी रुपये; भाजपच्या नेत्यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2023 13:58 IST2023-10-14T13:56:54+5:302023-10-14T13:58:09+5:30
‘जवळजवळ १०० लॉकर्समध्ये सुमारे ५०० कोटी रुपये व ५० किलो सोने आहे. पोलिसांनी येथे येऊन हे लॉकर्स उघडेपर्यंत मी गेटवरच ठिय्या मारीन.

जयपूरमधील १०० खासगी लॉकर्समध्ये ५० किलो सोने आणि ५०० कोटी रुपये; भाजपच्या नेत्यांचा दावा
जयपूर : जयपूरमधील १०० खासगी लॉकर्समध्ये ५० किलो सोने आणि ५०० कोटी रुपयांचा काळा पैसा ठेवण्यात आला आहे, असा आरोप भाजपचे राज्यसभा सदस्य किरोडीलाल मीना यांनी शुक्रवारी केला. हे लॉकर्स कोणाचे आहेत, हे मात्र त्यांनी उघड केले नाही.
‘जवळजवळ १०० लॉकर्समध्ये सुमारे ५०० कोटी रुपये व ५० किलो सोने आहे. पोलिसांनी येथे येऊन हे लॉकर्स उघडेपर्यंत मी गेटवरच ठिय्या मारीन.’ असे त्यांनी सांगितले. किरोडीलाल मीना हे भाजपचे सवाई माधोपूर मतदारसंघातील उमेदवार आहेत. त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि ज्या इमारतीत लॉकर्स आहेत तेथे येण्याची पत्रकारांना विनंती केली. त्यानंतर संबंधित इमारतीत जाऊन त्यांनी जयपूर पोलिसांनी लॉकर्स उघडावेत, अशी मागणी करीत तेथे धरणे धरले.