मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर कंटेनरसह ७० लाखाचे गोमास जप्त, दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2017 16:18 IST2017-12-15T16:18:44+5:302017-12-15T16:18:51+5:30
गुरुवारी पहाटे पाच वाजण्याच्या सूमारास मुंबई-पुणो द्रुतगती महामार्गावरील सावरोली टोलनाका येथे विनापरवाना गोमांस वाहतूक करणारा कंटेनर क्र. एनएल-०१/एल-७१३६ खालापूर पोलीसांच्या पथकाने जप्त केला आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर कंटेनरसह ७० लाखाचे गोमास जप्त, दोघांना अटक
- जयंत धुळप
रायगड- गुरुवारी पहाटे पाच वाजण्याच्या सूमारास मुंबई-पुणो द्रुतगती महामार्गावरील सावरोली टोलनाका येथे विनापरवाना गोमांस वाहतूक करणारा कंटेनर क्र. एनएल-०१/एल-७१३६ खालापूर पोलीसांच्या पथकाने जप्त केला आहे. कंटेनरसह जप्त करण्यात आलेल्या या गोमासाची किंमत 70 लाख रुपये आहे.
हे गोमास कोलकत्ता येथून मुंबईस नेण्यात येत होते. कंटेनर चालक अजगरअली रशीदअली खान याच्यासह अन्य एकास खालापूर पोलीसांनी अटक केली आहे. या प्रकरणी भा.द.वि.कलम ५०४,५०६,३४ आणि महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ अन्वये गून्हा दाखल करण्यात आला असून पूढील तपास खालापूरचे सहा.पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार हे करीत आहेत.