शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

तंटामुक्त अध्यक्षपदी महिला

By admin | Updated: August 27, 2015 01:00 IST

महाड तालुक्यातील दासगाव येथील १५ आॅगस्टची तहकूब ग्रामसभा मंगळवारी पार पडली. वारंवार पुरुषच अध्यक्षपद घेत आहेत. महिलांना कधी संधी मिळणार, महिला तंटे मिटविण्यास

दासगाव : महाड तालुक्यातील दासगाव येथील १५ आॅगस्टची तहकूब ग्रामसभा मंगळवारी पार पडली. वारंवार पुरुषच अध्यक्षपद घेत आहेत. महिलांना कधी संधी मिळणार, महिला तंटे मिटविण्यास कधी सक्षम होणार या दृष्टिकोनातून तंटामुक्त अध्यक्षपद महिलेला देण्याचे ठरवत गावातील पंचायत समिती सदस्यपद महिला विनीता चांढवेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.२००७ साली तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी गावागावात लोकांमध्ये बंधुभाव निर्माण होवून लोकांमध्ये सलोखा कायम राहावा, त्याचबरोबर छोट्या मोठ्या गोष्टीसाठी गोरगरीब लोकांना कोर्टकचेऱ्याचा फेऱ्या माराव्या न लागाव्यात तसेच छोटे - मोठे तंटे गावपातळीवरच मिटवण्यात यावेत यासाठी २००७ साली तंटामुक्त कायदा महाराष्ट्रात अमलात आणला. त्याबरोबर गावोगावी तंटामुक्त कमिट्यांची स्थापना झाली. मात्र कमिटी तयार करण्यासाठी वारंवार यामध्ये आजतागायत राजकारण होत असल्याचे पहावयास मिळत आहे. दासगाव या गावची लोकसंख्या पाच हजार आहे. या ठिकाणी आतापर्यंत पुरुष हेच अध्यक्षपद घेत होते. १५ आॅगस्टची तहकूब ग्रामसभा ही सोमवारी पार पडली. या सभेमध्ये जवळपास १०० हून अधिक नागरिकांनी भाग घेतला होता. महत्त्वाचे म्हणजे या सभेमध्ये महिलांची संख्या कमी होती. आपल्या गावामध्ये अद्याप महिलांना अध्यक्षपद मिळालेले नाही. महिला तंटे मिटविण्यास कशा पद्धतीने सक्षम होतील. महिलांचे मत महिलांच जाणू शकतात या दृष्टिकोनातून पुढील पाच वर्षांचा तंटामुक्त अध्यक्षपदाचा मान महिलेला देण्याचे ठरवत विनीता चांढवेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. विनीता चांढवेकर या महाड पंचायत समिती सदस्या आहेत. (वार्ताहर)विश्वासाला तडा जावू देणार नाहीगावातील नागरिकांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला मी तडा जावू देणार नाही.गावातील समस्या, काही भांडणे असतील ही सर्व गावपातळीवरच मिटवून घेईल, कोणत्याही तऱ्हेचा नागरिकांना त्रास होवून देणार नाही, अशी भावना विनीता चांढवेकर यांनी व्यक्त केली. महाड शहर पोलीस ठाणे हद्दीत तंटामुक्त कमिटीमध्ये २८ गावांचा समावेश आहे. मात्र या सर्व गावांमध्ये अद्याप महिलांना अध्यक्षपदाचा मान मिळाला नसून दासगांव हे पहिले गाव आहे. त्यांनी महिलांची कदर केली आहे. त्यामुळे सर्वत्र स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे. महिला तंटे मिटविण्यास कधी सक्षम होणार या दृष्टिकोनातून तंटामुक्त अध्यक्षपदी पंचायत समिती सदस्यपदी विनीता चांढवेकर यांची निवड केली आहे.