शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

"संयम सुटला की कोणपण फुटला"; मनसेच्या वसंत मोरेंनी दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 16:46 IST

रायगड जिल्ह्यातील कोलाड येथे जागर यात्रेदरम्यान बोलताना मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी थेट इशाराच दिला.

मुंबई/रायगड - राज्यात गेली पंधरा वर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गामुळे संताप व्यक्त होत असताना मनसेने रविवारपासून कोकण जागर यात्रेचा प्रारंभ केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोलाड येथील सभेतून राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला. तसेच, आंदोलक मनसैनिकांवर होत असलेल्या कारवाईलाही प्रत्युत्तर दिले. दरम्यान, येथील यात्रेत अमित ठाकरेही सहभागी झाले आहेत. या यात्रेदरम्यान, मनसेचे पुण्यातील माजी नगरसेवक वसंत मोरे यांनीही सहभाग घेतला असून मंत्री महोदयांवर जोरदार टीका केलीय. तसेच, सरकारला एकप्रकारे इशाराही दिलाय.

रायगड जिल्ह्यातील कोलाड येथे जागर यात्रेदरम्यान बोलताना मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी थेट इशाराच दिला. अस्वलाच्या अंगावर ४-५ केस वाढले तर काही फरक पडत नसतो. मनसैनिकांना केसेस होतील असे कुणी आम्हाला सांगू नका, आम्ही त्याला घाबरत नाही. तसेच, आज जशी यात्रा आहे, तशा यात्रा पुन्हा होतील हा विश्वास आमच्यावर ठेऊ नका. कारण, संयम जर सुटला तर कोणपण फुटला हे सांगता येणार नाही. 

मंत्री बोलत आहेत की, महाराष्ट्र सैनिक उठतो आणि कुठेतरी रस्त्यावर जाऊन नुकसान करतो. पण, मला वाटतं ज्याला जी भाषा कळते, त्या भाषेत समजून सांगणार पक्ष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना असल्याचं मोरे यांनी म्हटलं. निवडणुका जवळ आल्या की आंदोलन व्हायला लागले, असं समजायंचं, असे मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं. पण, सामंतसाहेब, तुम्हाला आज कळाल असेल की निवडणुका जवळ आल्या आहेत. मात्र, तुम्ही जेव्हा पक्ष बदलला तेव्हाच आम्हाला कळालं निवडणुका जवळ आल्या आहेत, असे म्हणत उदय सामंत यांच्यावर पलटवार केला. 

जागर यात्रा ही आंदोलनाचा सभ्य मार्ग - राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पदयात्रा हा आंदोलनाचा सभ्य मार्ग असल्याचे सांगत, सरकारला जाग आणण्यासाठी हे आंदोलन करीत आहोत. रस्त्यावर पडलेला खड्डा भरता येतो, पण गेलेलं माणसाचं आयुष्य परत मिळत नाही, अशी भावनिक साद घालत राज ठाकरेंनी सरकारवर जोरदार टीका केली. मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडपट्टीवर ते म्हणाले, जी माणसे तुम्हाला लुटत आली त्यांच्या हातात तुम्ही सत्ता देत आहात. तुम्ही जागृत राहा. कोकणी बांधवांना गेली अनेक वर्षे खड्डे सहन करावे लागतात. याचा तुम्हाला राग कसा येत नाही, असे आवाहनही त्यांनी केले. आंदोलन करणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिस स्टेशनमध्ये अंडरवेअरवर बसवलं. सरकार कोणतंही असो, आजचं असो किंवा कालचं.  सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीही आलेले नसते, असा इशाराही त्यांनी दिला.

टॅग्स :RaigadरायगडMNSमनसेhighwayमहामार्गagitationआंदोलन