शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2019 1:20 AM

अस्मानी संकटाने हैराण :आम्ही आता नक्की करायचे तरी काय? शेतकऱ्यांचा करुण प्रश्न

नागोठणे : विभागातील वरवठणे येथील गोकुळ पाटील यांची स्वत:ची ४७ गुंठे जमीन असून पत्नीच्या नावे दुसरी ५५ गुंठे जमीन आहे. दोन्ही शेतांत भाताचे पीक घेतले जाते. पडलेल्या पावसामुळे हातातोंडाशी आलेले जवळपास ९० टक्के पीक नष्ट झाले असल्याची खंत पाटील यांनी व्यक्त केली. भाताची लागवड करण्यापासून लावणी कापणीसाठी या दोन्ही शेतांसाठी ३० ते ३२ हजार रुपयांचा खर्च आम्हाला येत असतो. ही कामे करण्यासाठी कुटुंबातील सदस्यांचा सुद्धा हातभार लागत असल्याने सर्व कामांसाठी १०० टक्के मजूर घेतले, तर हाच खर्च काही हजारांनी वाढू शकतो असे त्यांनी सांगितले.

सर्वजण मदत करत असल्याने दरवर्षी दहा ते बारा खंडी भात आमच्या हातात येत असतो. मात्र, पावसाने यावर्षी फक्त दहा टक्के पीक हातात आले असले तरी, तांदूळ पांढºया ऐवजी पिवळ्या रंगाचा होणार असून ते खाण्या योग्य सुध्दा राहणार नाही अशी खंत पाटील यांनी व्यक्त केली. घरात खाण्यासाठी भात काढून ठेवल्यावर उर्वरित भात दरवर्षी विकून टाकत असतो. व्यापारी बाराशे रुपये क्विंटल दराने भात खरेदी करतात. तर, सोसायटीचे तो विकत घेतला, तर हाच भाव सतराशे रुपये दराने मिळत असतो. या वर्षी भात हातातच येत नसल्याची भीती व्यक्त करताना शेतकºयांनी आता कोणावर भरोसा ठेवायचा, असे त्यांनी उद्विग्नपणे सांगितले. सरकारी अधिकाºयांनी शेतीची पाहणी केली आहे. गतवर्षी झालेल्या शेतीच्या नुकसानीची अद्याप भरपाई मिळालेली नाही अथवा बँकेत सुध्दा पैसे जमा झालेले नाहीत. कृषी खात्याकडून लवकरच पैसे तुमच्या खात्यात जमा होतील असे सांगितले जात असले तरी, ते फक्त आश्वासनच राहिले असल्याचे गोकुळ पाटील यांनी सांगितले.सुरुवातीला हंगामातील पावसाने पिकाचे नुकसान झाले, त्यातून आम्ही सावरलो... पुन्हा पोटाला चिमटा काढत काम केलं... जोमदार पीक शिवारात डोलताना पाहून बरं वाटलं...मात्र निसर्गानेच आमचा घात के ला...तयार झालेले भाताचे पीक, मागील आठवड्यात पडलेल्या परतीच्या मुसळधार पावसाने आमच्या तोंडातून काढून घेतले... या अस्मानी संकटाने वर्षभराची आमची मेहनत वाया गेली... आता खायचे काय?... गुरांच्या पेंढ्याचेही नुकसान झाले... गुरांसाठी कु ठून खाद्य आणायचे?...आम्ही आता नक्की करायचे तरी काय, असा सवाल वरवठणे येथील एक शेतकरी गोकुळ पाटील यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला. 

टॅग्स :RaigadरायगडRainपाऊसFarmerशेतकरी