शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: December 22, 2016 06:26 IST

तालुक्यातील नांदवी प्राथमिक आरोग्य केंद्राची नवीन इमारत बांधून सहा महिने झाले. तरीही अतिशय जीर्ण व भाड्याच्या इमारतीत

गिरीश गोरेगावकर / माणगावतालुक्यातील नांदवी प्राथमिक आरोग्य केंद्राची नवीन इमारत बांधून सहा महिने झाले. तरीही अतिशय जीर्ण व भाड्याच्या इमारतीत सध्या रुग्णालय सुरू आहे. त्यामुळे रु ग्णांची गैरसोय होते. या इमारतीचे काम सुद्धा टप्प्याटप्प्याने झाले आहे. त्यामुळे उद्घाटन कधी होणार, या प्रतीक्षेत येथील नागरिक आहेत.रु ग्णांच्या आरोग्यासाठी नेहमी तत्पर असणारे आरोग्य खाते, तसेच ई-आरोग्याच्या वल्गना करणारे शासन नांदवी आरोग्य केंद्राच्या बाबतीत मात्र उदासीन असल्याचे दिसते. विशेष म्हणजे राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्याच गावातील आरोग्य केंद्राला गंभीर समस्यांनी ग्रासले आहे. २००० पासून स्थापन झालेले नांदवी प्राथमिक आरोग्य केंद्र हे अद्यापपर्र्यंत भाड्याच्या जागेत चालवले जात आहे. अनेक पदे रिक्त आहेत. या केंद्राअंतर्गत १४ गावे, १९ वाड्या यांची एकूण नऊ हजार लोकसंख्या आहे. केंद्रातील ओपीडी सरासरी ४० ते ५० असते. अपूर्ण जागा, अपुरा कर्मचारी वर्ग अशा एक ना अनेक समस्यांनी या आरोग्य केंद्राला ग्रासले आहे. नांदवी येथे महिलांसाठी प्रसूतीगृह नसल्याने रु ग्णांचे प्रचंड हाल होतात. रुग्णाला प्रसूतीसाठी हरकोल उपकेंद्रात किंवा माणगाव येथे उपजिल्हा रु ग्णालयात हलवले जाते. नांदवी प्रा. आरोग्य केंद्राला दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची गरज असून एकच अधिकारी गेली कित्येक वर्षे रात्रं-दिवस रु ग्णसेवा देत आहेत. सद्य:स्थितीत मात्र वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांचे फार हाल होत आहेत.नवीन इमारतीचे उद्घाटन अद्याप झाले नाही. इमारत ताब्यात घेण्यासाठी जिल्हा परिषद बांधकाम खात्याकडून आरोग्य खात्याला पत्रव्यवहार केला आहे. इमारत बांधकाम, आॅपरेशन विभाग, स्त्री-पुरुष कक्ष, वैद्यकीय अधिकारी कक्ष यासाठी ६९ लाखांची मंजुरी दिली होती. कर्मचारी, अधिकारी यांचे निवासस्थान व विविध महत्त्वाच्या कामांसाठी ५० लाखांची वाढीव मागणी जिल्हा परिषदेच्या बांधकाम खात्याने आरोग्य खात्याकडे केली आहे, मात्र दोन वर्षांपासून त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही.आरोग्य सहाय्यक, दोन शिपाई, वाहन चालक तसेच औषध निर्माता, आरोग्य सहाय्यिका अशी अनेक पदे रिक्त आहेत. परिसरातील १४ गावे, तसेच १९ वाड्यांवरील नागरिकांसाठी आरोग्य केंद्र असून, आरोग्य सेवा नाही अशी अवस्था झाली आहे.