शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

वाकू्रळवर महिलाराज

By admin | Updated: October 14, 2015 02:57 IST

महिलाशक्तीची नवरात्रीत पूजा होत असताना घटस्थापनेचा शुभ मुहूर्त साधीत ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत मंगळवारी ग्रुप ग्रामपंचायत वाक्रूळच्या ११ जागांसाठी

पेण : महिलाशक्तीची नवरात्रीत पूजा होत असताना घटस्थापनेचा शुभ मुहूर्त साधीत ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत मंगळवारी ग्रुप ग्रामपंचायत वाक्रूळच्या ११ जागांसाठी ११ महिला उमेदवारांनी शेवटच्या दिवशी निवडणूक अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर केले. यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली आहे.पंचक्रोशीतील महिलांनी गावाच्या विकासासाठी नवरात्रोत्सवाच्या शुभारंभी चांगला निर्णय घेत ११ महिला उमेदवाराचे अर्ज सादर केले. पेणमध्ये प्रथमच वाक्रूळ ग्रामपंचायतीवर महिलांचे राज्य अवतरणार आहे. शेकापच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व विद्यमान सदस्या अ‍ॅड. नीलिमा पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाक्रूळ ग्रामपंचायतीचा पुढील पाच वर्षे शेकापच्या ११ भगिनी एकहाती राज्यकारभार करणार असल्याने वाक्रूळ ग्रामपंचायत शासनाच्या बक्षिसास पात्र ठरणार आहे.पंचायतराज संस्थांमध्ये ५० टक्के महिला आरक्षणामुळे सहा महिलांचा बोलबाला सुरू आहे. वाक्रूळ ग्रामस्थांनी आ. धैर्यशील पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य महादेव दिवेकर व खरेदी-विक्री संघाचे चेअरमन बापू दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत ११ जागा ११ महिलांचे उमेदवारी अर्ज भरण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला. ग्रामस्थांनी त्यास एकमताने संमती दिल्यावर अ‍ॅड. नीलिमा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवारी अर्ज भरण्यात आले. मंगळवारी निवडणूक अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी सार्वत्रिक निवडणूक असलेल्या आंबेघर ९ जागा २० अर्ज, खारपाले ११ जागा ४७ अर्ज, जोहे ११ जागा २५ अर्ज, कामार्ली ११ जागा २७ अर्ज, वाक्रूळ ११ जागा ११ अर्ज. वाक्रूळ बिनविरोध ग्रामपंचायत वगळता ४ सार्वत्रिक निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतींच्या ४२ जागांसाठी १०८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. पोटनिवडणूक जाहीर झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये वरप २ जागा २ अर्ज, वरसई १ जागा १ अर्ज, आंबिवली १ जागा ० अर्ज, बेलवडे ३ जागा ० अर्ज अशाप्रकारे चार ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी तीन अर्ज दाखल झाले आहेत. (वार्ताहर)