शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan sabha 2019 : महाडमध्ये शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन, भरत गोगावले यांचा उमेदवारी अर्ज दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 02:55 IST

महाड-पोलादपूर-माणगाव मतदारसंघातील युतीचे उमेदवार भरत गोगावले यांनी महाडमध्ये शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज मंगळवारी निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल इनामदार यांच्याकडे दाखल केला.

दासगाव - महाड-पोलादपूर-माणगाव मतदारसंघातील युतीचे उमेदवार भरत गोगावले यांनी महाडमध्ये शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज मंगळवारी निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल इनामदार यांच्याकडे दाखल केला.अर्ज दाखल करताना दक्षिण रायगडचे जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, माजी जिल्हाप्रमुख विजय खुळे, प्रमोद घोसाळकर, महाड विधानसभा सहसंपर्कप्रमुख विजय सावंत हे उपस्थित होते. शक्तिप्रदर्शन करताना छ. शिवाजी चौकामधील सभेला संबोधित करताना या पुढचे आमदार आपणच असणार असून, ३५ हजारांच्या फरकाने निवडून येण्याचा आत्मविश्वास व्यक्त केला. अर्ज दाखल केल्यानंतर भरत गोगावले यांनी छ. शिवाजी महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. तसेच महाडचे ग्रामदैवत श्री विरेश्वर महाराज यांच्यासह सर्व देवी-देवतांचे दर्शनही घेतले.महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील सभेत आ. गोगावले यांनी विरोधकांवर टीकेची झोड उठवली. आम्ही सर्वसामान्य माणसाच्या गरजा ओळखून काम करतो, म्हणूनच दोन वेळा लोकांनी निवडून दिले आहे. आताही या निवडणुकीत आम्ही पुन्हा विजयी होऊ, असा आत्मविश्वास व्यक्त केला. लोकांना दुपारपर्यंत झोपणारा आमदार नको आहे तर दिवसरात्र लोकांची सेवा करणारा आमदार पाहिजे, अशा शब्दात विरोधकांवर तोफ डागली. शिवसेनेला संपवण्याची भाषा करणाऱ्यांचे काय झाले, हे उभ्या महाराष्टÑाने पाहिले आहे. यामुळे शिवसेनेचा नाद करायचा नाही, अशा शब्दात राष्टÑवादीच्या शिवस्वराज्य यात्रेचा समाचार घेतला.या वेळी व्यासपीठावर युवा सेना अधिकारी विकास गोगावले, सुषमा गोगावले, पद्माकर मोरे, सुभाष पवार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. जाहीर सभेनंतर छ. शिवाजी महाराज चौक ते महाड प्रांत कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने शिवसैनिक दाखल झाले होते.मित्रपक्षांचे फक्त झेंडे दिसले पदाधिकारी गायबभरत गोगावले यांनी अर्ज दाखल करण्यापूर्वी शिवसेना-भाजप युती झाली. यामुळे महाड विधानसभा मतदारसंघात आता भाजप स्वतंत्र उमेदवार उभा करण्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. राज्यात शिवसेना-भाजपबरोबर रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया व इतर मित्रपक्षही आहेत. मात्र, मंगळवारी भरत गोगावले यांनी अर्ज दाखल करताना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर केवळ शिवसेनेचे पदाधिकारीच उपस्थित होते. घेतलेल्या सभेदरम्यानही व्यासपीठावर केवळ भाजप-आरपीआयचे झेंडेच असल्याचे निदर्शनास आले.रवि पाटील यांना महायुतीतर्फे अधिकृत उमेदवारीपेण : १९१ पेण विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्ष, शिवसेना, आरपीआय, रासप, महासंग्राम, रयत क्रांतिमित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून माजी मंत्री रवि पाटील यांची अधिकृत उमेदवारी मंगळवारी जाहीर करण्यात आली आहे.भारतीय जनता पक्षाच्या पहिल्या यादीत रवि पाटील यांचे नाव जाहीर झााले व पेण विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांनी फटाके लावून एकच जल्लोष साजरा केला. भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी मिळाल्याने त्यांनी केलेला पक्षप्रवेश व मुख्यमंत्री यांनी दिलेला शब्द अखेर पाळल्याची भावना कार्यकर्त्यांना पटली. येत्या १० ते १५ दिवसांत भारतीय जनता पक्ष-शिवसेना महायुती विरुद्ध शेतकरी कामगार पक्ष, राष्टÑवादी, जोगेंद्र कवाडे गट आघाडीचे आमदार धैर्यशील पाटील यांच्याशी प्रमुख लढत होणार आहे.एकंदर येत्या दहा दिवसांत भारतीय जनता पक्षाविरुद्ध शेकाप अशी चुरशीची होईल, असा राजकीय विश्लेषकांचा दावा आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019mahad-acमहाड