शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यासाठी झटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 00:51 IST

बी. जी. कोळसे-पाटील । लोकशासन आंदोलन संघर्ष समितीची सभा

नागोठणे : आजपर्यंत एकही आंदोलन अयशस्वी झाले नाही. मी सांगतो त्या मार्गाने चला, यश निश्चितच आपले आहे. समोरील शत्रू फार प्रबळ असल्याने यापुढे गनिमी काव्याने काम करणार आहे. स्वत:चा कोणताही स्वार्थ नसल्याने कोणालाही घाबरत नसून शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या कल्याणासाठी झटणार असल्याची स्पष्टोक्ती मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती तथा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. जी. कोळसे-पाटील यांनी प्रकल्पग्रस्तांना दिली.

लोकशासन आंदोलन संघर्ष समितीच्या नागोठणे शाखेच्या वतीने नागोठणे ते चोळे मार्गातील भूमिहीन प्रकल्पग्रस्त, नलिकाग्रस्त शेतकरी, कायम आणि कंत्राटी कामगार, सुशिक्षित बेरोजगार युवक तसेच निवृत्त कामगारांची सभा शुक्रवारी सायंकाळी उशिरा रिलायन्स कंपनी लगतचे कुहिरे परिसरात पार पडली. त्या वेळी अध्यक्षीय भाषणात कोळसे-पाटील बोलत होते. सरकारला कर रूपाने किंवा इतर मार्गाने पैसे देणाऱ्यांमध्ये ९० टक्के गरीब व उर्वरित १० टक्के च भांडवलदार शासनाला कर देत असतात. सगळे एकत्र आलेत तर मूठभर दडपशाही करणारे निश्चितच मागे पडतील. तुमच्या प्रश्नांबाबत या कंपनीला निर्णय घेण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली असून, संविधानाच्या मार्गाने लढा करण्यात येईल, असा इशारा कोळसे-पाटील यांनी दिला.या सभेला संघटनेचे राष्ट्रीय सल्लागार अ‍ॅड. संतोष म्हस्के, मुख्य संघटक राजेंद्र गायकवाड आदींसह शेकडो प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.न्यायाची लढाई सुरू-म्हस्केप्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसाठी अहिंसेच्या मार्गाने लोकशाही तसेच न्यायाची ही लढाई सुरू झाली असल्याचे अ‍ॅड. संतोष म्हस्के यांनी सांगितले. रिलायन्स कंपनीने स्थानिक अध्यक्ष शशांक हिरे यांना निलंबित केले असल्याने म्हस्के यांनी हिरेंचा दाखला देत व्यवस्थापनाने माणसांच्या जीवाशी खेळ करायला सुरुवात केली असल्याचा आरोप केला.

टॅग्स :Raigadरायगड