काशीद येथे दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 07:12 IST2019-06-24T07:12:00+5:302019-06-24T07:12:09+5:30

मुरूड तालुक्यातील काशीद समुद्रकिनारी पोहण्यासाठी गेलेल्या दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला. अभिषेक म्हात्रे (३२) आणि पूजा शेट्टी (२८) अशी मृतांची नावे आहेत.

 Two tourists drowned in Kashid | काशीद येथे दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू

काशीद येथे दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू

आगरदांडा : मुरूड तालुक्यातील काशीद समुद्रकिनारी पोहण्यासाठी गेलेल्या दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला. अभिषेक म्हात्रे (३२) आणि पूजा शेट्टी (२८) अशी मृतांची नावे आहेत.
पनवेल नावडे येथे राहणारे अभिषेक म्हात्रे पत्नीसमवेत काशीद येथील एका मित्राच्या फार्महाउसवर रविवारी गेले होते. संध्याकाळी सातच्या सुमारास त्यांच्या समवेत आलेली पूजा अशोक शेट्टी आणि अभिषेक हे समुद्राच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरले. अभिषेक यांची पत्नी किनाऱ्यावरच थांबली होती. समुद्रात उतरल्यानंतर ते दोघेही खोल समुद्रात ओढले गेले. अभिषेक यांच्या पत्नीने आरडाओरडा करताच ग्रामस्थांनी त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र बेशुद्ध अवस्थेत ते सापडले. रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Web Title:  Two tourists drowned in Kashid

टॅग्स :Deathमृत्यू