शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

वादळामुळे धरमतरकडे निघालेल्या दोन बार्ज भरकटल्या: दोन्ही बार्ज उरणच्या किनाऱ्यावर: कर्मचारी सुखरूप 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 10:49 PM

Uran: मुंबईकडून इस्पात कंपनीकडे निघालेल्या परंतु वादळामुळे भरकटलेल्या दोन मालवाहू बार्ज उरण-केगाव येथील खडकाळ किनाऱ्यावर पोहोचल्या आहेत.

- मधुकर ठाकूरउरण : मुंबईकडून इस्पात कंपनीकडे निघालेल्या परंतु वादळामुळे भरकटलेल्या दोन मालवाहू बार्ज उरण-केगाव येथील खडकाळ किनाऱ्यावर पोहोचल्या आहेत. या भरकटलेल्या दोन्ही बार्जची, कोस्ट गार्ड, नवीमुंबई सागरी सुरक्षा शाखेचे पोलिस आणि तहसिलदारांनी माहिती घेतल्यानंतर अनेक शंका कुशंका दूर झाल्याची माहिती उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.

मुंबईकडून मंगळवारी  ( ९ ) एसएन ऑल कंपनीचै  ( ९ ) एमव्ही- श्रीकांत आणि अरब इंटरप्राईझेस कंपनीचे एमव्ही- जी-२  या दोन मालवाहू बार्ज  रायगड जिल्ह्यातील धरमतर येथील इस्पात कंपनीकडे निघाल्या होत्या.मात्र वादळामुळे समुद्रात उसळणाऱ्या उंचच लाटांमुळे नांगर तोडून या दोन्ही बार्ज भरकटून उरण तालुक्यातील केगाव - माणकेश्वर मंदिराच्या किनाऱ्यावर येऊन ठेपल्या आहेत.एमव्ही- श्रीकांत ही रिकामी बार्ज केगाव - माणकेश्वर मंदिराजवळील तर एमव्ही- जी-२ अरब इंटरप्राईझेस ही दुसरी बार्ज सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या करंजा-एनएडी नेव्ही जेट्टीच्या खडकाळ किनाऱ्यावर मध्यरात्रीच्या सुमारास लागल्या आहेत.

या दोन्ही मालवाहू बार्जची सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोस्ट गार्डने हेलिकॉप्टरने पाहणी केली.तसेच नवीमुंबई  सागरी सुरक्षा शाखेचे पोलिस अधिकारी पृथ्वीराज भामरे आणि तहसिलदारांच्या पथकाने पाहणी केली आहे.या दोन्ही बार्जवर पण प्रत्येकी पाच-सहा खलाशी आहेत. या दोन्ही बार्जच्या  खलाशांकडे मदत हवी नको यासाठीही चौकशी करण्यात आली.मदतीची आवश्यकता नसल्याचे  कर्मचाऱ्यांनी सांगितले. चौकशीअंती रेडॲलर्ट उठविण्यात आल्यानंतर दोन्ही बार्ज इच्छीत स्थळी धरमतरकडे रवाना होणार आहेत.तसेच कर्मचाऱ्यांनीही आपापल्या कुटुंबियांशी संपर्क साधून सुखरूप असल्याचे कळविले असल्याची माहिती उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.

टॅग्स :Raigadरायगड