शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विद्यार्थ्यांचे ‘होस्टेल तेथे उपोषण’

By admin | Updated: September 1, 2015 04:40 IST

आपल्या वसतिगृहातील सोयी-सुविधा आपल्याला मिळण्याकरिता २१ आॅगस्टला पेण येथील आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालयात, शासनाच्या वसतिगृहात राहणाऱ्या

जयंत धुळप, अलिबागआपल्या वसतिगृहातील सोयी-सुविधा आपल्याला मिळण्याकरिता २१ आॅगस्टला पेण येथील आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालयात, शासनाच्या वसतिगृहात राहणाऱ्या आदिवासी मुलांनी स्वत:ला व कर्मचाऱ्यांना कोंडून घेण्याचे आंदोलन केले होते. त्यावेळी आदिवासी मुलांवर दाखल केलेले फौजदारी स्वरुपाचे गुन्हे मागे घ्यावेत अशा मागणीचे निवेदन आदिवासी प्रकल्प अधिकारी, जिल्हाधिकारी यांना दिले होते. याबाबत कार्यवाही न करता, गुन्हेही मागे घेतले नाहीत. हे गुन्हे मागे घ्यावेत यासाठी रायगड, ठाणे, पालघर, पुणे जिल्ह्यातील शासकीय आदिवासी वसतिगृहांतील मुलांनी सोमवारपासून ‘जेथे होस्टेल तेथे उपोषण’ हे आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाची माहिती आदिवासी मुला-मुलींचे शासकीय वसतिगृह कृती समितीचे सुनील तोटावाड, अजय तुंबडा व योगेश खाडे यांनी दिली आहे. २१ आॅगस्टला आंदोलनावेळी आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह पनवेल व कोळवाडी वसतिगृहातील विद्यार्थ्यांवर झालेल्या फौजदारी कार्यवाहीच्या अनुषंगाने पेण येथील प्रकल्प अधिकारी रंजना दाभाडे यांची बदली करावी तसेच पोलीस तक्रार मागे घ्यावी अशी आमची मागणी असल्याचे तोटावाड यांनी सांगितले. अपर आयुक्त ठाणे अंतर्गत येणाऱ्या ८७ वसतिगृहांपैकी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पेण, या प्रकल्पाअंतर्गत आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह पनवेल येथील विद्यार्थ्यांनी, ठाणे अपर आयुक्तालयाअंतर्गत येणाऱ्या सर्व वसतिगृहांसाठी व स्वत:ला भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरणासाठी वारंवार आदिवासी विकास विभागाच्या प्रत्येक कार्यालयात लोकशाही मार्गाने पत्रव्यवहार करुन मोर्चा, आंदोलने, अर्ज, विनंत्या केल्या होत्या. पेण प्रकल्प अधिकारी रंजना दाभाडे यांना पत्रव्यवहार करुनही त्यांनी समस्यांचे निराकरण करण्यासंदर्भात विद्यार्थ्यांना भेट देण्यासाठी कोणत्याही हालचाली केल्या नाही. या संदर्भात विद्यार्थी त्यांच्याकडे भेट घेण्याकरिता गेले असता प्रकल्प अधिकारी यांनी तेथेही विद्यार्थ्यांस भेटण्यास नकार दिल्याने विद्यार्थ्यांनी २१ आॅगस्टला पनवेल, पेणसह कर्जत व प्रकल्पातील इतर ३५० च्या आसपास विद्यार्थी हे कार्यालयात कोंडून घेणाऱ्यात समाविष्ट होते. १०० पेक्षा जास्त विद्यार्थी हे प्रकल्पाच्या समोर रस्त्याच्या दुतर्फा उभे होते. परंतु प्रकल्प अधिकारी रंजना दाभाडे यांनी विद्यार्थ्यांच्या समस्यांचा विचार न करता ज्या नऊ विद्यार्थ्यांनी शासनस्तरावर माहिती अधिकारात माहिती मागितली होती त्यांच्यावर पूर्ववैमनस्य व आकसबुध्दीने पुढे करत ३०९ विद्यार्थ्यांवर बनावट गुन्हे दाखल केल्याचे निवेदनात नमूद आहे.