शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

नेरळमध्ये कचराप्रश्न गंभीर; योग्य विल्हेवाट लावण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 00:12 IST

नेरळ ग्रामपंचायतीमध्ये ठिकठिकाणी साठलेल्या कचऱ्याने नागरिक हैराण झाले आहेत, या कचऱ्यामुळे मोकाट गुरे आणि कुत्र्यांचा त्रास वाढला आहे. हा कचरा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उचलून योग्य विल्हेवाट लावावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

नेरळ : नेरळ ग्रामपंचायतीमध्ये ठिकठिकाणी साठलेल्या कचऱ्याने नागरिक हैराण झाले आहेत, या कचऱ्यामुळे मोकाट गुरे आणि कु त्र्यांचा त्रास वाढला आहे. हा कचरा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उचलून योग्य विल्हेवाट लावावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.विस्ताराने, लोकसंख्येने आणि आर्थिकदृष्ट्या जिल्ह्यात नेरळ ग्रामपंचायतीचा प्रथम क्र मांक लागतो. जवळच असलेल्या कर्जत नगरपरिषदेपेक्षा नेरळ ग्रामपंचायतीची लोकसंख्या जास्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार जवळपास २५००० एवढी लोकसंख्या नेरळ ग्रामपंचायतीची आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीचे उत्पन्नही जास्त आहे. ग्रामपंचायत हद्दीत नागरीकरणही मोठ्या प्रमाणात आहे. नेरळ बाजारपेठेतील वाहतूककोंडी त्यांनी फोडली, तर अनेक वर्षे रखडलेले मटण, मच्छी मार्केट स्थलांतर झाले. लोकवस्तीतला कचरा डेपो देखील हटवला, नेरळमधील कचराकोंडी आजही फुटलेली नाही ही वस्तुस्थिती आहे. नेरळ ग्रामपंचायतीने नुकत्याच दोन नवीन घंटागाड्या घेतल्या, मोठ्या प्रमाणात सफाई कामगार ग्रामपंचायतीकडे आहेत. मात्र तरीही पाडा, निर्माणनगरी, कर्जत-कल्याण हायवे याठिकणी कचरा कायम पडलेला दिसतो. तर अनेक गृहनिर्माण संस्थांना गतवर्षी ग्रामपंचायत प्रांगणात वाटलेल्या कचरा कुंड्या ओव्हरफ्लो झाल्याचे दिसून येत आहे.नेरळ ग्रामपंचायतीमध्ये ४२ सफाई कामगार आहेत, ग्रामपंचायत कुठेही कमी पडते असे मला वाटत नाही, उलट आता कचरा वेळेत उचलला जातोय असे ग्रामस्थच मला सांगतात.- जान्हवी साळुंके, सरपंच, नेरळ ग्रामपंचायत

टॅग्स :Karjatकर्जत