शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
3
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
4
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
5
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
6
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
7
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
8
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
9
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
10
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
12
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
13
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
14
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
15
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
16
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
17
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
18
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
19
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
20
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज

आज राष्ट्रीय रक्तदान दिन : ‘रक्तदाता’ हाच खरा देवदूत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2018 3:16 AM

प्रभावी जनजागृतीची गरज

जयंत धुळप 

अलिबाग : एकविसाव्या शतकात माणसाने सर्वच क्षेत्रात अनेक शोध लावले आहेत. शरीरात कृत्रिम अवयव बसविले जातात; परंतु कृत्रिम रक्त तयार करण्याचे तंत्र अद्याप आत्मसात केलेले नाही, त्यामुळेच स्वैच्छिक रक्तदान महत्त्वाचे ठरते. ही मोहीम व्यापक करून रक्तदानाचे महत्त्व जनसामान्यांना सांगण्यासाठी शासकीय स्तरावर मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत आहे, तर अनेक स्वयंसेवी संस्था-संघटनाही याकरिता सक्रिय आहेत. यंदाच्या १ आॅक्टोबर रोजी संपन्न होत असलेल्या रक्तदान दिनाकरिता ‘रक्तदानातच आनंद आहे!’ असे घोषवाक्य घेण्यात आले आहे.

राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिवस सर्वप्रथम १ आॅक्टोबर, १९७५ या दिवशी इंडियन सोसायटी आॅफ ब्लड ट्रान्सफ्यूजन अ‍ॅण्ड इम्युनो हिमॅटोलॉजी या संस्थेच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. इंडियन सोसायटी आॅफ ब्लड ट्रान्सफ्यूजन अ‍ॅण्ड इम्युनो हिमॅटोलॉजी या संस्थेची स्थापना २२ आॅक्टोबर, १९७१ या दिवशी के. स्वरूप क्रिशेन आणि डॉ. जे. जी. ज्वाली यांनी केली. रक्त हे कुठल्याही प्रयोगशाळेत अथवा कृत्रिमरीत्या तयार करता येत नाही, तर ते केवळ शरीरातच तयार होते. ज्यांनी स्वैच्छिक रक्तदान २५, ५०, ७५, १०० वेळा वा त्यापेक्षा अधिक वेळा केले आहे, अशा रक्तदात्यांचा सन्मान शासनस्तरावर केला जातो. रक्तदाता हा रु ग्णाचे प्राण वाचविणारा खऱ्या अर्थाने देवदूतच ठरतो. तब्बल ११७ वर्षापूर्वी १९०१ मध्ये कार्ल लॅड स्टेनर यांनी ए, बी, ओ, रक्तगटांचा शोध लावला, तर एबी रक्तगटांचा शोध ए. डिकास्ट्रिलो व ए. स्टुर्ली यांनी १९०२ मध्ये लावला. रक्तातील अत्यंत महत्त्वाचा घटक ठरणाºया आरएच फॅक्टरचा शोध १०३७ मध्ये अ‍ॅलेक्झांडर विनर यांनी लावला. तर १९५२ मध्ये भारतीय डॉक्टर मुंबईतील डॉ. वाय. एम. भेंडे यांनी बॉम्बे ब्लड ग्रुपचा शोध लावला. डॉ. बर्नार्ड फैन्टस यांनी अमेरिकेत प्रथम कुक काउंटी हॉस्पिटल शिकागो (अमेरिका) येथे सन १९३७ मध्ये रक्तदात्यांचे रक्त सुरक्षित संकलन करण्यासाठी ‘ब्लड बँक’ अशा शब्दाचा सर्वप्रथम प्रयोग करून पहिली ब्लड बँक (रक्तपेढी) स्थापन केली.स्वैच्छिक रक्तदानात सहभाग महत्त्वाचादेशात वर्ल्ड हेल्थ आॅर्गनायझेशन, राष्ट्रीय रक्तसंक्र मण परिषद, राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था आदी मार्फ त महाराष्ट्रात महाराष्ट्र शासन, राज्य रक्तसंक्र मण परिषद, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी यांच्या अधिपत्याखाली जिल्हा रु ग्णालय, महानगरपलिका, महाविद्यालये, धर्मदाय संस्था, रेडक्र ॉस, स्वयंसेवी संस्था, सामाजिक सेवाभावी संस्था आदी मार्फत स्वैच्छिक रक्तदान मोहिमेत रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. समाजाचा एक जबाबदार घटक या नात्याने प्रत्येकाने स्वैच्छिक रक्तदान करून रक्तदाता म्हणून सहभागी होऊन आपले मित्र, नातेवाईक यांनादेखील रक्तदानासाठी प्रवृत्त करावे, हाच १ आॅक्टोबर या स्वैच्छिक रक्तदान दिनाच्या आयोजनामागील महत्त्वाचा हेतू आहे.रक्तदानाचे १० फायदेच्रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी होते.च्रक्तदाब, हृदयरोग व कर्करोगासारख्या आजारांच्या धोक्याचे प्रमाण कमी होते.च्बोनमॅरोमध्ये नवीन रक्त तयार करण्याची क्षमता वाढते.च्रोगप्रतिकारक शक्ती वाढून नवचेतना निर्माण होते.च्रक्ताद्वारे शरीरात आॅक्सिजन पुरवला जातो व कार्बनडायआॅक्साइड बाहेर पडण्यास मदत होते.च्नियमित रक्तदानाने शरीरातील लोहाचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा अधिक वाढत नाही.च्हृदय-यकृतासारखे अवयव स्वस्थ राहतात.च्एका वेळी रक्तदानाने शरीरातील ६५० कॅलरीज कमी होतात.च्लालपेशी शरीरात अभिसारण प्रक्रि येत १२० दिवस लागतात.च्रु ग्णाचे प्राण वाचविण्याचे समाधान मिळते.

टॅग्स :Blood Bankरक्तपेढीalibaugअलिबाग