शहरं
Join us  
Trending Stories
1
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
2
"ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
3
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
4
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
5
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
6
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
7
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
8
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
9
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
10
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
11
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
12
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
13
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
14
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
15
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

हेटवणे सिंचनातून तीन हजार एकरांवरील भात लागवड पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 11:50 PM

पेणच्या शेतकऱ्यांना दिलासा: रब्बी हंगामातील लागवडीच्या क्षेत्रात वाढ

पेण : हेटवणे धरण कालव्याच्या शेतीसाठी सोडण्यात येणाऱ्या सिंचनाच्या पाण्यावर आधारित भात लागवडीच्या ३००० एकर  क्षेत्रातील भातपीक लागवडीचे काम शेतकऱ्यांनी पूर्ण क्षमतेने करून दहा दिवसांचा कालावधी लोटला आहे. सध्या  पिकांना खतांची मात्रा देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामात तब्बल १३०० एकराहून अधिक क्षेत्रावर​ भातपीक लागवड केल्याने या अगोदर असलेल्या १७०० एकर क्षेत्रात भर पडून उन्हाळी हंगामातील भात लागवडीच्या क्षेत्राने एकूण ३००० एकराचा टप्पा गाठला आहे.

सध्या पिकांच्या अनुकूल वाढीसाठी उपयुक्त असे पोषक वातावरण आहे. पडलेला अवकाळी पाऊस, भरपूर पाणी, ऊन व खतांची मात्रा मिळाल्याने पिके बहरली असून या परिसरात सर्वत्र हिरवागार निसर्ग परिसर अनुभवता​ येतो आहे. रब्बीच्या हंगामात भात लागवडीच्या क्षेत्रात वाढ होण्याचे प्रमुख कारण म्हणजे सरकारने भाताला प्रति क्विंटलला दिलेला १८८०/-रुपये हमीभाव व ७०० रुपये प्रति क्विंटलला बोनस मिळून  २५८०/-रुपये मिळणारी आधारभूत किंमत, याशिवाय भाताच्या पेंढ्यांची एक गुंडी  ६ ते ८ रुपयांस गुरांच्या वैरणीसाठी  दुग्ध व्यावसायिक खरेदी करत असल्याने या पेंढ्यातून एकरी खर्च केलेला उत्पादन खर्च निघत असल्याने उन्हाळ्यात भातशेती लागवड शेतकऱ्यांना फायदेशीर ठरते. याशिवाय गत वर्षात कोरोनाच्या उपद्रवामुळे बहुतेक शेतकरी शेतीकडे वळले. नफा असो वा तोटा, शेती पिकवायचीच हा श्रम साफल्याचा मंत्र अनुसरून शिवारात मोठी गर्दी पाहावयास मिळाली होती..

शेती उत्पादनासोबतीने भाजीपाला शेती, झेंडू, मोगरा, रताळी, हळद, कंदमुळे, वाल, पावटा, भुईमूग इत्यादी प्रकारची उत्पादने सध्या उन्हाळी हंगामात शेतकरी घेत आहेत. मुबलक पाणी, भरपूर प्रमाणात सूर्यप्रकाश, रात्रीचा गारवा, खते व कीटकनाशकांची मात्रा यामुळे नैसर्गिक अशा पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त वातावरणनिर्मिती होत असल्याने पिकांची जोमदारपणे वाढ होऊन शेतकऱ्यांच्या पदरात केलेल्या कष्टाचे फळ मिळून भरघोस उत्पन्नाची​ शाश्वत हमी असल्याने रब्बीच्या हंगामात शेतकरी शेती उत्पादन मोठ्या प्रमाणात घेत आहेत. केलेला खर्च व नफा यांचा योग्य ताळमेळ जुळत असल्याने   येथील शेतकरी बांधवांनी वर्षासाठी दोन वेळा  उत्पादन घेतले आहे. हा सिलसिला यापुढे असाच कायम राहील, असे येथील शेतकऱ्यांनी  सांगितले.

टॅग्स :Raigadरायगड