विचित्र अपघातात तिघांचा होरपळून मृत्यू, कर्जतजवळ कार व रिक्षाची धडक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 06:55 AM2021-03-30T06:55:54+5:302021-03-30T06:56:19+5:30

कर्जत-कल्याण रस्त्यावरील डिकसळ गावाजवळ झालेल्या विचित्र अपघातात तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला.

Three persons died in a bizarre accident, a car and a rickshaw collided near Karjat | विचित्र अपघातात तिघांचा होरपळून मृत्यू, कर्जतजवळ कार व रिक्षाची धडक

विचित्र अपघातात तिघांचा होरपळून मृत्यू, कर्जतजवळ कार व रिक्षाची धडक

Next

कर्जत : कर्जत-कल्याण रस्त्यावरील डिकसळ गावाजवळ झालेल्या विचित्र अपघातात तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला. सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास एक कार व रिक्षाची धडक झाली. यात कार आणि रिक्षा जळाली. यामुळे रिक्षातील तीन जणांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. त्यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. जोराच्या धडकेने रिक्षातील सीएनजी टाकीचा स्फोट झाला असावा, असा प्रथमदर्शनी अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

कर्जत-कल्याण राज्यमार्गावर डिकसळमधील सिद्धिविनायक हॉस्पिटलसमोर साडेतीनच्या सुमारास हा अपघात झाला. नेरळकडून कर्जतकडे जाणाऱ्या रिक्षाला मागून येणाऱ्या कारने धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की, दोन्ही गाड्यांना आग लागली. रिक्षातील सीएनजी टाकीचा स्फोट झाला असावा, असे काहींचे म्हणणे आहे. स्थानिकांनी याची पोलीस व कर्जत अग्निशमन दलाला माहिती दिली. सर्व यंत्रणा अपघातस्थळी दाखल झाल्या. तोपर्यंत दोन्ही गाड्या आगीत भस्मसात झाल्या होत्या. अपघातानंतर कारमधील प्रवासी खाली उतरल्याने ते बचावले. तर रिक्षातील सरिता मोहन साळुंके (रा. नेरळ), सुभाष जाधव व शुभांगी सुभाष जाधव (रा. बदलापूर) यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला.

Web Title: Three persons died in a bizarre accident, a car and a rickshaw collided near Karjat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.