Three killed in explosion in Mangaon Company | माणगाव कंपनीतील स्फोट, तीन कामगांराचा मृत्यू            
माणगाव कंपनीतील स्फोट, तीन कामगांराचा मृत्यू            

अलिबाग - माणगाव येथील क्रीप्टझो कंपनीमध्ये शुक्रवारी झालेल्या स्फोटात तीन कामगारांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तर, तीन आयसीयुमध्ये आणि 11 कामगार जनरल वॉर्डमध्ये उपचार घेत आहेत. एका कामगारास डिस्चार्ज केले आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयाने दिली.

कंपनी स्फोटातील कामगारांवर नॅशनल बर्न सेंटर, ऐरोली येथे उपचार सुरू आहेत. मृत कामगांराची नावे 1. आशिष एकनाथ येरूनकर रा. म्हसेवाडी ता. माणगाव, 2. कैलास पाडावे रा. शिरावली ता. माणगाव आणि 3. राकेश हलदे रा.उंबर्डी ता. माणगाव अशी आहेत. कंपनीमध्ये झालेल्या स्फोटाला जबाबदार कोण, स्फोट कोणत्या कारणांनी झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. जिल्हा प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, या स्फोटामध्ये 18 कामगार जखमी झाले आहेत.
 

Web Title: Three killed in explosion in Mangaon Company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.