शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

धावत्या बसची चाके निखळली; 40 प्रवाशांसह सावित्री नदीत पडता पडता वाचली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2022 9:46 AM

मंडणगड आगाराची  मंडणगड-नालासोपारा ही एसटी मंडणगड आगारातून सकाळी महाड डेपोमध्ये आली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कमहाड :  मंडणगड-नालासोपारा ही एस.टी. बस महाड तालुक्यातील केंबुर्ली गावहद्दीत आल्यावर धावत्या बसची दोन्ही चाके निखळल्याची घटना बुधवारी घडली.  ही बस रस्त्याच्या कडेला घसरली. मात्र सावित्री नदीमध्ये पडता-पडता थोडक्यात वाचली; अन्यथा २०१६ ची पुनरावृत्ती घडली असती.  या बसमधून जवळपास  ४० प्रवासी प्रवास करीत होते. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये एस.टी. महामंडळाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

मंडणगड आगाराची  मंडणगड-नालासोपारा ही एसटी मंडणगड आगारातून सकाळी महाड डेपोमध्ये आली होती. सकाळी १० वाजता ती बस महाडहून मुंबईकडे जाण्यास रवाना झाली. तालुक्यातील केंबुर्ली गावहद्दीत एका वळणावर ही बस धावत असताना ॲक्सलसह उजव्या बाजूची दोन्ही चाके निखळली आणि काही अंतर ही बस घसरत गेली. बाजूलाच सावित्री नदी होती. मात्र थोडक्यात बस नदीत जाता-जाता वाचली.

२ ऑगस्ट २०१६ रोजी याच महामार्गावरील सावित्री नदीवर पुलाचा कठडा तोडून बस नदीपात्रात कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. त्यामध्ये २२ प्रवाशांचा नाहक बळी गेला होता. बुधवारी त्याच घटनेची पुनरावृत्ती चालकाच्या प्रसंगावधानामुळे टळली. 

परीक्षणशिवाय धावतात लांब पल्ल्याच्या बसअनेक आगारांतून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या बसचे कोणतेच परीक्षण केले जात नाही. त्याचबरोबर वाहनासाठी सोबत लागणारे साहित्य (टुल बॉक्स) ही दिले जात नाही. त्याचा त्रास मात्र प्रवाशांना भोगावा लागतो. रस्त्यामध्ये एखादी बस पंक्चर झाली तर त्या चालकाला इतर वाहनांची साहित्यासाठी वाट पाहावी लागते. 

टॅग्स :state transportएसटी