शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक; गोलंदाजीत अकिल होसीन इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

मद्य विक्रेत्यांवर कारवाई करा

By admin | Updated: April 20, 2017 03:47 IST

नेरळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत अनेक गावांमध्ये हातभट्टीची दारू बनविण्याचे आणि विक्र ीचे धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत.

नेरळ : नेरळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत अनेक गावांमध्ये हातभट्टीची दारू बनविण्याचे आणि विक्र ीचे धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. काही ठिकाणी नेरळ पोलिसांनी हातभट्ट्यांवर कारवाई केली आहे. परंतु अनेक गावांमध्ये खुलेआम दारू विक्र ी केली जात आहे. अशा दारू विकणाऱ्यांवर कठोर कारवाई करून नेरळ परिसर दारूमुक्त करावा, अशी मागणी मानवाधिकार संघटनेने नेरळ पोलिसांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे, अन्यथा अखिल भारतीय मानवाधिकार संघटना उपोषण करेल असा इशारा दिला आहे.नेरळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत अनेक गावांमध्ये हातभट्टी दारू बनविण्याचे आणि विक्र ीचे धंदे खुलेआम सुरु आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणचे तरु ण या व्यसनाच्या आहारी जात आहेत. यामुळे अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. मागील चार वर्षांपासून मानवाधिकार संघटनेने या विरोधात सतत आवाज उठवत रायगड पोलीस अधीक्षक, रायगड जिल्हा उत्पादन शुल्क, उत्पादन शुल्क आयुक्त यांच्याकडे अनेकवेळा तक्र ारी केल्या आहेत. परंतु याकडे थातूरमातूर कारवाई केली आहे. अनेक गावांमध्ये सर्रास दारू विक्र ी होत असल्याने त आदिवासी बांधव व काही गावातील तरु ण व्यसनाच्या आहारी जात आहेत. दारूच्या अतिसेवनाने तरु ण दगावत आहेत. अनेक ठिकाणी तर कुटुंबाचा आधार असलेल्या तरु णाचा दारूमुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे नेरळ पोलिसांनी नेरळ परिसरातील अनेक गावांमध्ये जाऊन जे कोणी दारू बनवत आहेत व दारूची विक्र ी करत आहेत यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी मानवाधिकार संघटनेने नेरळ पोलीस उपनिरीक्षक आर. एन. तडवी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी मानवाधिकार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रवीण मोर्गे, उप जिल्हा अध्यक्ष गोरख शेप, कर्जत तालुका अध्यक्ष गणेश शेळके, संपर्क प्रमुख संदीप गायकवाड, सचिव महेंद्र मोगरे, सोयब जळगावकर, मयूर कांबरी आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)