जन्मजात ह्रदयविकार असलेल्या 14 वर्षांच्या येमेनी मुलावर यशस्वी उपचार

By वैभव गायकर | Published: April 2, 2024 04:24 PM2024-04-02T16:24:02+5:302024-04-02T16:24:42+5:30

जन्मतःच रक्तातील ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्वचा, ओठ किंवा नखे निळे पडणे, थकवा आणि सायनोसिस यासारखी लक्षणे या मुलामध्ये आढळून आली होती.

successful treatment of a 14 year old yemeni boy with congenital heart disease | जन्मजात ह्रदयविकार असलेल्या 14 वर्षांच्या येमेनी मुलावर यशस्वी उपचार

जन्मजात ह्रदयविकार असलेल्या 14 वर्षांच्या येमेनी मुलावर यशस्वी उपचार

लोकमत न्युज नेटवर्क, वैभव गायकर, पनवेल : येमेन देशातील  १४ वर्षीय मुलावर खारघर मधील मेडिकव्हर हॉस्पिटल मध्ये यशस्वी हृदयविकाराची शस्त्रक्रिया झाली असल्याने या मुलाला जीवनदान मिळाले आहे.  

जन्मतःच रक्तातील ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्वचा, ओठ किंवा नखे निळे पडणे, थकवा आणि सायनोसिस यासारखी लक्षणे या मुलामध्ये आढळून आली होती. रुग्ण युसेफ सालेह अवध महदी (14) या मुलावर निळसर त्वचेमुळे त्याचा मूळ रंग पहायलाच मिळत नव्हता मात्र यशस्वी उपचाराने आता त्याची त्वचा सामान्य त्वचेप्रमाणे दिसू लागली आहे. रुग्ण युसेफ सालेह अवध महदी या मुलाला थकवा आणि सायनोसिस यासारख्या तक्रारी होत्या. त्याची त्वचा, ओठ किंवा नखे जन्मत:च रक्तात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे निळे पडत होती. तो जन्मापासूनच वैद्यकीय व्यवस्थापनावर अवलंबून होता आणि त्याच्यावरील अंतिम उपचार म्हणजे शस्त्रक्रिया.

वयानुसार श्वासोच्छवास आणि सायनोसिस वाढत गेल्याने त्यांची तब्येत आणखी खालावत गेली. रुग्णाने डॉक्टर अभय जैन यांचा सल्ला घेतला आला आणि शस्त्रक्रियेच्या 15 दिवसांपूर्वी मेडिकवर रुग्णालयात दाखल झाला.या मुलावर शस्त्रक्रिया करणारे डॉ. अभय जैन यांनी सांगितले की;हा दुर्मिळ जन्मजात ह्रदयाचा आजार जगात एक हजार नवजात बालकांपैकी अवघ्या 0.34 टक्के बाळांमध्ये आढळतो. हा आजार असलेल्या व्यक्तीच्या हृदयात छिद्र पडल्यामुळे ऑक्सिजनयुक्त आणि डीऑक्सीजनयुक्त रक्ताचे मिश्रण होते. त्याच्या शरीरात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण जास्त असल्याने त्याचे शरीर निळे पडले. महदि याच्यावर यशस्वी प्रक्रियेने आधी फुफ्फुसातील रक्त प्रवाह सुधारण्याचा प्रयत्न करण्यात आला. यासाठी 8 तासांची दुर्मिंल शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याचे डॉ जैन यांनी सांगितले.

Web Title: successful treatment of a 14 year old yemeni boy with congenital heart disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :panvelपनवेल