शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळेतील विद्यार्थी वाऱ्यावर

By admin | Updated: August 8, 2015 21:58 IST

येथील नेल्सन मंडेला निवासी आश्रमशाळेतील माध्यमिक विभागाची मान्यता रद्द करण्याचा शासनाकडून निर्णय घेण्यात आला असून विद्यार्थी मात्र या निर्णयाने पुन्हा एकदा वाऱ्यावर आले आहेत.

नागोठणे : येथील नेल्सन मंडेला निवासी आश्रमशाळेतील माध्यमिक विभागाची मान्यता रद्द करण्याचा शासनाकडून निर्णय घेण्यात आला असून विद्यार्थी मात्र या निर्णयाने पुन्हा एकदा वाऱ्यावर आले आहेत. याबाबत शाळेचे मुख्याध्यापक गव्हाणे यांनी हा निर्णय शनिवारी वृत्तपत्रांमध्येच मी वाचला असून आम्हाला अद्यापि तसे पत्र आले नसल्याचे सांगितले. नागसेन एज्युकेशन सोसायटी अ‍ॅण्ड बुद्धिस्ट कल्चरल ट्रस्ट, मुंबई संचलित नेल्सन मंडेला निवासी आश्रमशाळा अनेक वर्षे येथे कार्यरत आहे. आश्रमशाळेच्या व्यवस्थापनाबाबत चौदा त्रुटी आढळून आल्याने २० जून २०१३ रोजी शासनाच्या आदेशान्वये या शाळेची मान्यता रद्द करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर सहा महिन्यांची मुदतवाढ देऊन या त्रुटींची पूर्तता करण्याच्या अटींवर गतवर्षी जून २०१४ ला ही शाळा पुन्हा चालू करण्यात आली होती. या शाळेत पहिलीपासून दहावीपर्यंतचे वर्ग असून सध्या एकशे पंधरा विद्यार्थी शिकत आहेत व त्यासाठी नऊ शिक्षक कार्यरत आहेत. या वर्षीचे शैक्षणिक वर्ष चालू झाल्यानंतर साधारणत: पावणेदोन महिन्यांनी माध्यमिक शाळेची मान्यता रद्द करण्याचा निर्णय शुक्र वारी जाहीर करण्यात आला आहे. २०१३ नंतर असा प्रकार पुन्हा एकदा घडल्याने माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळांचा रस्ता पकडण्याची वेळ आली आहे. या आश्रमशाळेत शिकणारे सर्वच विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातीलच असल्याने माध्यमिक विभागाच्या बंदीमुळे मुलांच्या भावी शिक्षणाचा प्रश्न पालकवर्गासमोर उभा राहिला आहे. यामुळे आपल्या पाल्याचे शैक्षणिक वर्ष वाया जाईल, अशी भीती पालकांना वाटत आहे. (वार्ताहर)