शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

खराब रस्त्यांमुळे एसटी वाहतूक कोलमडली

By admin | Updated: August 26, 2015 00:09 IST

महाड व पोलादपूर तालुक्यांतील ग्रामीण भागातील रस्त्याच्या दुरवस्थेमुळे स्थानिक ग्रामस्थांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. खराब रस्त्यांवर एसटी

महाड : महाड व पोलादपूर तालुक्यांतील ग्रामीण भागातील रस्त्याच्या दुरवस्थेमुळे स्थानिक ग्रामस्थांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. खराब रस्त्यांवर एसटी गाड्या चालविणे महामंडळाला अवघड झाले असून कमी प्रवासी आणि खराब रस्त्यामुळे गाड्यांचे होणारे नुकसान अशा स्थितीत महाड आगाराला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे.दोन्ही तालुक्यांच्या दुर्गम भागात बहुतांश ठिकाणी मिनीडोर वा सहा आसनी रिक्षासारख्या वाहनांचे जाळे पसरलेले आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे वाहनचालक देखील हैराण होत आहेत. रस्त्यांच्या अशा अवस्थेमुळे ग्रामीण भागातील ग्रामस्थ तसेच विद्यार्थ्यांना अनेकवेळा वाहनेच गावात येत नसल्यामुळे पायपीट करण्याशिवाय पर्यायच राहत नसल्याचे दिसून येत आहे. गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांची देखभाल दुरुस्ती करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभापतींनी दिले असले तरी या देखभालीसाठी गेली चार वर्षे निधीच आलेला नसल्याची बाब पुढे आली आहे. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे महाड पोलादपूर तालुक्यातील एसटीच्या अनेक फेऱ्या बंद करण्याची नामुष्की महाड आगारावर आली आहे. रस्त्यांच्या दुरुस्ती करण्याबाबत वाहतूक नियंत्रकाकडून जिल्हा परिषदेकडे अनेकवेळा पत्रव्यवहार करण्यात आला, मात्र याकडे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. महाड, पोलादपूर तालुक्यांत अनेक दुर्गम गावे असून एसटी गाड्या गावात येत नसल्याने ग्रामस्थांना मोठा फटका बसत आहे. (वार्ताहर)