शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

मुरुड, श्रीवर्धनला विशेष पर्यटनाचा दर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 23:38 IST

पर्यटनवृद्धीसाठी प्रस्तावाला गती देण्याचे आदेश : खारभूमीच्या चुकीच्या नोंदी काढण्याचे राज्यमंत्र्यांचे निर्देश

विशेष प्रतिनिधी ।लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : रायगड जिल्हा हा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. त्यामध्ये प्रामुख्याने मुरुड तालुक्याचे विशेष आकर्षण पर्यटकांना नेहमीच राहिलेले आहे. येथील काही जमिनींवर खारभूमी लाभक्षेत्र असा शिक्का मारल्याने विकासाला मारक ठरत होते. त्यांच्या जमिनीवरील नोंदी काढून टाकण्याचे निर्देश राज्यमंत्री तथा पालकमंत्री आदिती तटकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. जुन्नरला देण्यात आलेल्या विशेष पर्यटनाच्या धर्तीवर मुरुड आणि श्रीवर्धन तालुक्याचाही समावेश करण्यासाठी प्रस्तावाला गती द्यावी, असेही आदेश त्यांनी दिले आहेत. त्यामुळे आता रायगड जिल्ह्यातील पर्यटनवृद्धीला एक्स्ट्रा मायलेज मिळणार आहे.

जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, माथेरान या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटकांचा राबता असतो. जिल्ह्यामध्ये पर्यटनवृद्धीसाठी मोठ्या प्रमाणात क्षमता आहे. मात्र, काही नियम, कायदे आडवे येत असल्याने तेथील पर्यटनस्थळांचा विकास करणे शक्य होत नाही. विकासात्मक कामे करण्यावर बंधने येत असल्याने पर्यटन आणि त्या अनुषंगाने अन्य विकासाला ब्रेक लागत होता.

मुरुड शहर हे पर्यटनक्षेत्र म्हणून विकसित असताना, जमिनीच्या सात-बारा उताºयावर इतर हक्काच्या अधिकारामध्ये खारभूमी लाभक्षेत्रात समाविष्ट अशी नोंद करण्यात आली आहे. या नोंदी रद्द केल्यास येथील नागरिकांना पर्यटन व्यवसाय वृद्धी करणे सोपे जाणार आहे. ज्या जमिनी खारभूमी क्षेत्रातील आहेत, त्या वगळून इतर जमिनीवरील या चुकीच्या नोंदी रद्द झाल्यास येथील पर्यटन विकासाला गती येणार आहे. याच कारणासाठी राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी मंत्रालयामध्ये याच विषयावर गुरुवारी महत्त्वपूर्ण बैठक बोलावली होती.

या प्रसंगी खासदार सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, पर्यटन विभागाच्या उपसचिव उज्ज्वला दांडेकर, सहायक संचालक रवींद्र पवार, कोकण विभागाचे मुख्य अभियंता सं. निरमनवार, उत्तर कोकण पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता प्र. बा. मिसाळ, खारभूमी विभाग, पर्यटन विभाग, एमटीडीसी अधिकारी उपस्थित होते.श्रीवर्धनमधील शेतजमिनी वनेतर वापरास बंदी1श्रीवर्धन तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी वनेतर वापरास बंदी आहे. अशा शेतकºयांच्या जमिनीची माहिती घेऊन त्यांना त्या जमिनी, मिळकती विक्र ीसाठी सरकारची परवानगी देण्यासंदर्भात कार्यवाही करावी, असेही तटकरे यांनी आदेश दिले. मुरुड-जंजिरा येथे अनेक वर्षांपासून गाइड म्हणून कार्यरत असलेल्या स्थानिकांना विशेष प्रशिक्षण देऊन त्यांना मान्यता देण्यात यावी. तेथील जलवाहतुकीस परवानगी मिळण्यासंदर्भात कार्यवाही करावी. जुन्नरला विशेष पर्यटनाचा दर्जा देण्यात आला आहे.2याच धर्तीवर श्रीवर्धन आणिमुरुड तालुक्यासह जिल्ह्यातील विशेष पर्यटनाचा दर्जा देण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करून पुढील कार्यवाहीस गती द्यावी, जंजिरा पद्मदुर्ग तसेच दिवेआगार येथे जेट्टी उभारावी, कासू-गडब विभागातील खारभूमी योजनेअंतर्गत बंदिस्तीची दुरुस्ती करण्यासंदर्भात कार्यवाही करावी, अशाही सूचना राज्यमंत्री तटकरे यांनी संबंधित अधिकाºयांना दिल्या.