शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
3
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
4
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
5
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
6
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
7
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
8
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
9
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
10
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
11
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
12
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
13
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
14
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
15
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
16
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
17
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
18
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
19
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

घरी उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधितांवर विशेष लक्ष देणे गरजेचे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 00:59 IST

श्रीरंग बारणे : कर्जत तहसील कार्यालयात आढावा बैठक; तालुक्यातील कोरोना परिस्थितीची घेतली माहिती 

लोकमत न्यूज नेटवर्ककर्जत : ‘कोरोनाची दुसरी लाट महाभयंकर आहे. आपण सर्वच कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्नशील आहोत. तरीही आपण सतर्क राहून पंधरा दिवस मेहनत घेतली तर कोरोना नक्कीच नियंत्रणात येईल. खरंतर घरी उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधितांवर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. कारण ते स्वतः व त्यांचे कुटुंबीय बिनधास्तपणे फिरतात त्यामुळे कोरोनाचा फैलाव वेगात होतो. कोविडचे रुग्ण कमालीचे वाढत असल्यामुळे खासगी दवाखान्यांना कोविड सेंटरची परवानगी देताना तेथील सुविधा पाहणे गरजेचे आहे.' असे स्पष्ट प्रतिपादन खासदार श्रीरंग बारणे यांनी येथे केले.कर्जत तहसील कार्यालयात तालुक्यातील कोरोनाची परिस्थिती काय आहे? याबद्दल कर्जत व खालापूर तालुक्यातील अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आमदार महेंद्र थोरवे, नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, उपविभागीय अधिकारी वैशाली ठाकूर, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर, कर्जतचे तहसीलदार विक्रम देशमुख, खालापूरचे तहसीलदार इरेश चपलवार उपस्थित होते. याप्रसंगी आपला जीव धोक्यात घालून एका अंध मातेच्या बालकाचे प्राण वाचविणाऱ्या मयूर शेळकेचा खासदार बारणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मयूरचे आई वडीलही उपस्थित होते.खासदार बारणे यांनी,  'रायगड हॉस्पिटलमध्ये खासगी डॉक्टर काम करू इच्छित असतील तर त्यांची आमदारांच्या उपस्थितीत एक-दोन दिवसांत बैठक लावावी. आता १ मेपासून १८ वर्षांवरील नागरिकांना लसीकरण सुरू होणार आहे. त्यावेळी तरुणवर्गाची मोठी गर्दी होईल. त्यासाठी व्यवस्था करणे गरजेचे आहे. अन्यथा त्यांचा रोष लोकप्रतिनिधी आणि सरकारवर होईल.' असे स्पष्ट केले. आमदार थोरवे यांनी ‘कर्जत तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांना उपचाराची सुविधा मिळावी म्हणून रायगड हॉस्पिटलला कोविड रुग्णालयाचा दर्जा देऊन ते सुरू सुद्धा केले परंतु तेथे योग्य उपचार होतात की नाही? हे पाहणे गरजेचे आहे. हे हॉस्पिटल शासनाने अधिग्रहित केले तर तालुक्यातील जनतेला अधिक चांगली व मोफत सेवा तेथे उपलब्ध होऊ शकते. कर्जत उपजिल्हा रुग्णालयातसुद्धा अधिक सुविधा व वैद्यकीय अधिकारी नियुक्त करणे आवश्यक आहे तरच आपण येणाऱ्या आपत्तीवर मात करू शकू तसेच उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात असलेल्या जुन्या इमारतीतसुद्धा कोविड रुग्णांसाठी व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.' असे सूचित करून प्रशासनाच्या कामावर नाराजी व्यक्त केली.

कोरोना परिस्थितीचा आढावातहसीलदार विक्रम देशमुख यांनी तालुक्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा सादर केला. तहसीलदार चपलवार यांनी खालापूर तालुक्यातील कोरोनाची परिस्थिती कथन केली. खोपोलीचे मुख्याधिकारी गणेश शेट्ये यांनी 'खोपोली शहराच्या लोकसंख्ये प्रमाणे लस उपलब्ध होत नाही.' हे लक्षात आणून दिले. उपविभागीय अधिकारी वैशाली ठाकूर यांनी ‘आजच्या बैठकीत करण्यात आलेल्या सूचनांचे पालन करू.’ असा शब्द दिला. या बैठकीला गटविकास अधिकारी बालाजी पुरी, मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, नायब तहसीलदार सुधाकर राठोड आदींसह दोन्ही तालुक्यांतील अधिकारी वर्ग उपस्थित होता.

नगराध्यक्ष जोशी यांनी, ‘लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी अनेक संस्था पुढे येत आहेत त्याचा विचार करावा. अशी सूचना मांडली. उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बनसोडे यांनी 'रुग्णालयात तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. वीजपुरवठा खंडित होतो त्यावेळी उपकरणे बंद होतात त्यामुळे उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांना धोका होऊ शकतो. पंधरा वर्षांपूर्वी बसविलेला जनरेटर नादुरुस्त आहे. तेथे मोठ्या क्षमतेच्या जनरेटरची आवश्यकता आहे असे सांगितले.