शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचाने काढला ग्रामसभेतून पळ

By admin | Updated: August 26, 2015 00:10 IST

ग्रामसभेत जनतेच्या विविध प्रश्नांवर अर्थातच विविध समस्यांवर चर्चा, उपाययोजना होणे अपेक्षित असताना ग्रामसभेत जनतेच्या समस्यांवर चर्चा करून त्या सोडविण्याऐवजी कळंबुसरे गावच्या

उरण : ग्रामसभेत जनतेच्या विविध प्रश्नांवर अर्थातच विविध समस्यांवर चर्चा, उपाययोजना होणे अपेक्षित असताना ग्रामसभेत जनतेच्या समस्यांवर चर्चा करून त्या सोडविण्याऐवजी कळंबुसरे गावच्या सरपंचाने प्रश्नांच्या भडिमाराच्या भीतीपोटी चक्क ग्रामसभेतूनच पळ काढला. या पळपुट्या सरपंचाच्या विरोधात कळंबुसरे ग्रामस्थांकडून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.कळंबुसरे हे उरण पूर्व विभागातील गाव आहे. रविवारी ग्रामपंचायतीची ग्रामसभा घेण्यात आली. गावातील प्रश्न मांडण्यासाठी या सभेला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावात पाणी, रस्ते, वीज, ग्राम स्वच्छता, शाळेच्या नव्या इमारतीचा प्रश्न असे विविध प्रश्न प्रलंबित आहेत. गेल्या साडेतीन वर्षाच्या कालावधीत सरपंच सुशील राऊत यांनी एकाही प्रश्नाला न्याय दिला नसल्याचा जनतेचा आरोप आहे. गावातील ग्रामस्थांकडून घरपट्टी नियमित वसूल करणारी ग्रामपंचायत या विभागातील कंपन्यांकडून मालमत्ता कर का वसूल करीत नाही, असा सवाल ग्रामसभेत उपस्थित केला आहे. या प्रश्नावर समाधानकारक उत्तर न मिळाल्याने उपस्थित ग्रामस्थ संतप्त झाले. घरपट्टी थकविली म्हणून ग्रामस्थांची अडवणूक करणारा सरपंच मालमत्ता कर थकविणाऱ्या कंपनींवर जप्तीची कारवाई करण्याऐवजी कंपन्यांची दलाली करून त्यांना ना हरकत प्रमाणपत्र देत असल्याचा थेट आरोप ग्रामस्थांनी केला आहे.ग्रामस्थांनी ग्रामसभेत विविध प्रश्नांचा भडिमार केला. विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देता न आल्याने सरपंच सुशील राऊत यांनी ग्रामसभा अर्धवट सोडून पळ काढला. या निष्क्रीय सरपंचाचा कारभार पुढे चालू देणार नाही, असा इशारा भाजपाच्या संजय म्हात्रे यांनी दिला आहे. (वार्ताहर)