शिवसेनेचा जोरदार प्रचार

By Admin | Updated: November 18, 2016 03:24 IST2016-11-18T03:24:39+5:302016-11-18T03:24:39+5:30

सलग तिसऱ्या दिवशी प्रचार फेरी सकाळी राजाराम साळुंखे रोड प्रभाग क्र मांक ६ व ७ मधून

Shiv Sena's strong publicity | शिवसेनेचा जोरदार प्रचार

शिवसेनेचा जोरदार प्रचार

माथेरान : सलग तिसऱ्या दिवशी प्रचार फेरी सकाळी राजाराम साळुंखे रोड प्रभाग क्र मांक ६ व ७ मधून निघताच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा जोश आणि त्यात भगव्या टोप्या परिधान केलेल्या महिला प्रचार फेरीच्या लक्षवेधी होत्या. प्रचार फेरीत कार्यकर्त्यांचा उत्साह दिसत होता. विरोधकांना शह देण्यासाठी उमेदवारांसह नेते मंडळी प्रत्येकाच्या घराघरांत जाऊन मतदारराजाच्या भेटी घेतल्या. या
च्मतदारांचा विश्वास संपादन करून शिवसेनेची रणनीती समजावून सांगत होते. ‘आता नाही तर कधीच नाही’ असा प्रचार फेरीचा मूळ मुद्दा आहे. या वेळेस प्रचार फेरीला चांगलाच रंग चढला आहे. प्रभाग क्र मांक ६ मधून शिवसेनेचे उमेदवार संदीप कदम व प्रतिभा घावरे, तसेच आकाश चौधरी व सुषमा जाधव यांना शिवसेनेने संधी दिली आहे. जनता कोणाच्या पदरात मत टाकते हे वेळ ठरवणार आहे.

Web Title: Shiv Sena's strong publicity