शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

गाळमुक्त धरण, शिवार योजना लोकसहभागातून; रवींद्र चव्हाण यांचे अधिकाऱ्यांना आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 01:18 IST

नदी, नाले, विहिरी, धरण गाळमुक्त केल्यास पाण्याची समस्या भासणार नाही.

विशेष प्रतिनिधी ।अलिबाग : जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या आहे. या समस्येवर मात करण्यासाठी शासन ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना’ ही महत्त्वाकांक्षी योजना राबवित आहे. या योजनेची माहिती ग्रामीण भागातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येक गावात एक अधिकारी नेमण्यात यावा आणि लोकसहभाग जास्तीत जास्त प्रमाणात वाढावा. लोकसहभाग वाढल्यास योजनची कामे लवकरात लवकर होतील. यासाठी शासकीय विभागाच्या कृषी, महसूल आदी विभागातील अधिकारी, कर्मचारी वर्गानी प्रत्येक गावाचे नियोजन करून पाण्याच्या व्यवस्थापनाचा आराखडा तयार करावा, असे आदेश राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण व माहिती तंत्रज्ञान, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण राज्यमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी येथे दिले आहेत.गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना व ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत किसान कल्याण दिवस कार्यशाळेचे आयोजन येथील पी.एन.पी. नाट्यगृहात करण्यात आले होते. या वेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) विश्वनाथ वेटकोळी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश खोपकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पांडुरंग शेळके, आत्मा प्रकल्प संचालक पांडुरंग शिगेदार, नांदेड जिल्ह्यातील शेंबोली गावचे सरपंच बाळासाहेब देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. नियमित कामापेक्षा हे काम वेगळे असून ते नियोजनबद्ध झाल्यास वेगळेच समाधान तुम्हाला मिळणार आहे. जलक्र ांतीच्या कामात सर्वांनी सहभाग घ्यावा व योजनेचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, नागरिकांना जास्तीत जास्त प्रमाणात करून घ्यावा, असे आवाहनही चव्हाण यांनी या वेळी उपस्थित अधिकारी, कर्मचाºयांना केले.जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, पाणीटंचाईची समस्या सोडविण्यासाठी शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेचा एक भाग म्हणून गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना शासन राबविण्यता येत आहे. ही योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी यामध्ये लोकांचा सहभाग असणे गरजेचे असून, यासाठी मोठी लोकचळवळ उभी केली पाहिजे. गाळमुक्त धरण योजनेमुळे पाण्याची पातळी वाढते, पाण्याचे स्रोत वाढतात, तसेच काढलेला गाळ शेतकºयांनी शेतामध्ये वापरल्यास जमिनीची सुपीकता वाढून उत्पन्नवाढीसाठी याचा फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.नदी, नाले, विहिरी, धरण गाळमुक्त केल्यास पाण्याची समस्या भासणार नाही. या कामासाठी जेसीबीची कमतरता भासत असेल, तर त्याचीही पूर्तता करण्याचा प्रयत्न केला जाईल. ज्या तालुक्यांमध्ये कंपन्या आहेत, त्यांच्याशीही संपर्क साधून त्यांना योजनेत सहभागी करून घ्यावे. पोलादपूर तालुक्यातील १४ गावांमध्ये फ्री वॉटर कप योजना कार्यान्वित करण्यात आल्याचेही सूर्यवंशी यांनी अखेरीस सांगितले.

टॅग्स :Waterपाणी